Atiq Ahmed and Ashraf Ahmed shot dead :  कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम ऊर्फ अशरफ यांचे हत्या प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले आहे. सुप्रीम कोर्टाचे वकिल  विशाल तिवारी यांनी  सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. तसेच 2017 पासून झालेल्या 183 एनकाऊंटरचीही चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी याचिकेत केली आहे. दोघेही पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री भररस्त्यात तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  


सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत वकिल विशाल तिवारी यांनी 2017  पासून झालेल्या 183 एनकाऊंटरचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम यांच्या हत्येप्रकरणी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 2020 साली कानपूरच्या बिकरू हत्येनंतर विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्याचा देखील पोलिसांनी एन्काऊंटर केला. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. पोलीस कस्टडीमध्ये असताना हत्या झाल्याने या प्रकरणी अनेक सवाल उपस्थित होत आहे.  


हत्येची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कमिटी नेमण्यात यावी, वारीस पठाण यांची मागणी


गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कमिटी नेमण्यात यावी अशी मागणी एमआयएम नेते  वारीस पठाण यांनी देखील केली आहे.  पोलीस बंदोबस्तात गुंडांनी गोळीबार करून अतिक अहमद व त्यांच्या भावाची हत्या केली. खर तर पोलीस प्रशासनाने सुरक्षेची व्यवस्था करणे गरजेचे होते. तसेच अतिक अहमद याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती की त्याच्या जीवाला धोका आहेय  यूपी सरकारने देखील सांगितलं होतं की, त्यांच संरक्षण आम्ही करू परंतु अतिक अहमद व त्यांचे भाऊ यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली त्यामुळे या प्रकरणाची  निष्पक्ष चौकशी सुप्रीम कोर्टाकडून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 


उत्तर प्रदेश सरकारने रविवारी  केली तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची नियुक्ती


हत्याप्रकरणी चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने रविवारी तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची नियुक्ती केली. या चौकशी आयोगाने आपला अहवाल सरकारला दोन महिन्यांत द्यायचा आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्यभरात सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. प्रयागराजमध्ये ज्या भागात अतिक अहमद याचे निवासस्थान आहे, त्या भागात गस्त वाढविण्यात आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Atiq Ahmed Murder : उत्तर प्रदेशात रक्षण करणारी खाकीच रक्ताळली; गेल्या दोन वर्षात पोलिस कोठडीतील सर्वाधिक मृत्यू एकट्या उत्तर प्रदेशात!