Telangana SLBC Tunnel Accident : तेलंगणामध्ये आज शनिवारी (22 फेब्रुवारी) बोगद्याचा काही भाग कोसळल्याने किमान 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती आहे. श्रीशैलम धरणामागील बोगद्याचा काही भाग कोसळला. हा बोगदा नागरकुर्नूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल (SLBC) चा निर्माणाधीन आहे. कंपनीने तपासासाठी एक पथक आत पाठवले आहे. या घटनेवर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरने अपघातस्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकृत निवेदनानुसार, अहवालानुसार, बोगद्याच्या डाव्या बाजूला 14 किलोमीटर आत असलेले छत तीन मीटरपर्यंत कोसळले आहे.

बोगदा कोसळण्याच्या घटनेवर सीएमओने सांगितले की, "बोगदा कोसळल्याची आणि अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना सतर्क केले. त्यांनी जिल्हाधिकारी, एसपी, अग्निशमन विभाग, हायड्रा आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

मदत आणि बचाव कार्य सुरू   

अपघातानंतर मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने प्रयत्न सुरू केले आहेत. घटनेची चौकशी करण्यासाठी आणि कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. या भीषण अपघाताला सामोरे जाण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक अधिकारी आणि मदत कर्मचारी पूर्ण सतर्कतेने घटनास्थळी आहेत आणि अडकलेल्या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम वेगाने केले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या