Assembly Elections 2026: भारताच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल उद्या जाहीर होत आहे. विशेषतः दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. हिंदी भाषेला होणारा विरोध आणि 'द्रविडी' अस्मितेचे राजकारण या पार्श्वभूमीवर, या राज्यांमध्ये हिंदुत्वाचा विचार किती रुजला आणि प्रादेशिक पक्षांनी आपला गड कसा राखला, याचा फैसला उद्या होईल.

Continues below advertisement

Tamil Nadu Assembly Elections 2026: तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांची पकड की विजयची एन्ट्री?

तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी झालेल्या मतदानात एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके (DMK) आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या 'तामिळगा वेट्री कळघम' (TVK) या पक्षाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. DMK विरुद्ध AIADMK यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळणार आहे. विजय यांचा TVK पक्ष 18 ते 24 जागा जिंकण्याची शक्यता असून, यामुळे प्रस्थापित राजकारणासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. तर भाजप नेते के. अण्णामलाई यांच्या यात्रेमुळे भाजपने इथे आपली मुळे घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

Kerala Assembly Elections 2026: केरळमध्ये डाव्यांच्या गडाला काँग्रेस सुरुंग लावणार?

केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्तापालट होण्याची परंपरा आहे. गेल्या वेळी डाव्यांनी (LDF) ही परंपरा मोडीत काढली होती, मात्र यंदा 'यूडीएफ' (UDF) पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. 140 पैकी 71 हा बहुमताचा आकडा आहे. पीपल्स पल्सच्या अंदाजानुसार काँग्रेस प्रणीत UDF ला 75-85 जागा मिळू शकतात. भाजपने शबरीमला आणि ख्रिश्चन समुदायाशी साधलेल्या संवादामुळे इथे आपले खाते उघडण्याचा किंवा जागा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

Continues below advertisement

Puducherry Assembly Elections 2026: पुदुच्चेरीमध्ये एनडीएला पुन्हा संधी?

केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये एनडीए (NDA) पुन्हा सत्ता स्थापन करेल, असे चित्र आहे. 30 जागांच्या या विधानसभेत 16 हा बहुमताचा आकडा असून, भाजप आणि एआयएनआरसी आघाडीला इथे यश मिळताना दिसत आहे.

Assembly Elections 2026: तीनही राज्यातील विधानसभेच्या एकूण जागा

1. Tamil Nadu: तामिळनाडू

विधानसभा जागा: 234बहुमताचा आकडा: 118मुख्य लढत: द्रमुक (DMK+) आघाडी विरुद्ध अण्णाद्रमुक (AIADMK+) आघाडी

2. Kerala: केरळ 

विधानसभा जागा: 140बहुमताचा आकडा: 71मुख्य लढत: डावी लोकशाही आघाडी (LDF) विरुद्ध संयुक्त लोकशाही आघाडी (UDF)

3. Puducherry: पुदुच्चेरी

विधानसभा जागा: 30बहुमताचा आकडा: 16मुख्य लढत: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA - एआयएनआरसी + भाजप) विरुद्ध काँग्रेस-द्रमुक आघाडी

Exit Poll: एक्झिट पोलची सविस्तर आकडेवारी 

1. तामिळनाडू (एकूण जागा: 234 | बहुमत: 118)

PEOPLE PULSE

डीएमके (DMK+): 125-145 जागा

अण्णाद्रमुक (ADMK+): 65-80 जागा

टीव्हीके (TVK - विजय): 18-24 जागा

इतर: 02-06 जागा

AXIS MY INDIA

डीएमके (DMK+): 92-110 जागा

टीव्हीके (TVK - विजय): 98-120 जागा

अण्णाद्रमुक (ADMK+): 22-32 जागा

P-MARQ

डीएमके (DMK+): 122-132 जागा

अण्णाद्रमुक (ADMK+): 87-100 जागा

टीव्हीके (TVK): 10-12 जागा

TODAY'S CHANAKYA

डीएमके (DMK+): 125 जागा

टीव्हीके (TVK): 63 जागा

अण्णाद्रमुक (ADMK+): 454 जागा

2. केरळ (एकूण जागा: 140 | बहुमत: 71)

PEOPLE PULSE

काँग्रेस (UDF): 75-85 जागा

डावे (LDF): 65-75 जागा

भाजप (NDA): 00-03 जागा

AXIS MY INDIA

काँग्रेस (UDF): 78-90 जागा

डावे (LDF): 49-62 जागा

भाजप (NDA): 00-03 जागा

MATRIZE

काँग्रेस (UDF): 64-74 जागा

डावे (LDF): 62-72 जागा

भाजप (NDA): 01-03 जागा

३. पुदुच्चेरी (एकूण जागा: 30 | बहुमत: 16)

PEOPLE PULSE

एनडीए (NDA): 16-19 जागा

काँग्रेस (SPA): 10-12 जागा

इतर: 01-02 जागा

AXIS MY INDIA

एनआरसी (NRC+): 16-20 जागा

काँग्रेस: 06-08 जागा

टीव्हीके (TVK): 02-04 जागा

आणखी वाचा 

West Bengal Election 2026: सगळे एक्झिट पोल भाजपच्या बाजूने, पण शेवटच्या क्षणी ममता बॅनर्जींचा टीएमसीच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज, 'आपण 200 जागा जिंकतोय, शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका'