Continues below advertisement

नवी दिल्ली : भारत सरकारच्या स्वदेशी (Swadeshi) आणि आत्मनिर्भर भारत (Aatmanirbhar Bharat) मोहिमेला नवे बळ मिळाले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान (Information Technology) आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी आता आपल्या कामकाजासाठी झोहो (Zoho) या भारतीय सॉफ्टवेअर कंपनी (Indian software company) चे अॅप वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी अनेक मंत्री आणि सरकारी विभाग परकीय प्लॅटफॉर्म्सवर अवलंबून होते. झोहोचा स्वीकार करताना वैष्णव यांनी नागरिकांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीच्या आवाहनाला प्रतिसाद द्या, स्थानिक तंत्रज्ञान (Indigenous technology) वापरा असं आवाहन केलं आहे. झोहो ही चेन्नईस्थित कंपनी असून दस्तऐवज (Documents), स्प्रेडशीट (Spreadsheets), प्रेझेंटेशन, ई-मेल यांसारख्या सेवा पुरवते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ते आता दस्तऐवज, स्प्रेडशीट्स आणि सादरीकरणांसाठी झोहोचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरणार असून, हे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वदेशी' स्वीकारण्याच्या आवाहनाकडे एक ठोस पाऊल आहे.

Continues below advertisement

अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच नागरिकांना उत्सवी काळात स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर कर प्रणालीतील सुधारणा, GST दरकपात आणि GST बचत महोत्सव यांसारख्या उपक्रमांद्वारे लोकांच्या खरेदी क्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशा पार्श्वभूमीवर आयटी मंत्र्यांचा हा निर्णय धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.

तज्ज्ञांचे मत आहे की, अशा पावलांमुळे परकीय तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी होईल, डेटा गोपनीयता आणि सुरक्षा सुधारेल. तसेच स्थानिक सॉफ्टवेअर उद्योगाला प्रोत्साहन मिळेल.

Modi Swadeshi Mantra : मोदींचा स्वदेशी मंत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांपासून वारंवार स्वदेशी उत्पादन आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्याचा मंत्र दिला आहे. याचा उद्देश आहे विदेशी अवलंबित्व कमी करणे, स्थानिक उद्योग, सॉफ्टवेअर कंपन्या, छोटे व मध्यम उद्योग (MSMEs) यांना मोठी भूमिका मिळावी.

GST बचत महोत्सव

नुकत्याच लागू झालेल्या 'नेक्स्ट-जनरेशन GST' सुधारणा आणि 'GST बचत महोत्सव' या उपक्रमाद्वारे सरकारने करांची दर कमी केली आहे, नागरिकांच्या खर्चात सूट मिळवून दिली आहे आणि त्या अर्थाने लोकांच्या खरेदी क्षमतेला वाढ दिली आहे. हे धोरण स्वदेशी वस्तू वापरल्यास होणाऱ्या आर्थिक बचतीसोबत जुळते.

मोदींचे खुलं आवाहन

मोदी यांनी नागरिकांना, विशेषकरून उत्सवी काळात (festive season) स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा आवाहन केले आहे, हे संदेश जनतेमध्ये पुढे जात आहेत. त्यात स्वदेशीचा अर्थ केवळ उत्पादन नव्हे पण सेवांमध्ये आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममध्येही स्थानिक पर्याय स्वीकारणे असा आहे.