नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनाच्या यशानंतर एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी आंदोलक तरुणांचे कौतुक केले आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील जाहीर सभेत बोलताना ओवैसी म्हणाले, "मी त्या तरुणांना सलाम करतो ज्यांनी जंतर-मंतरवर बसून असा मंत्र उच्चारला की पंतप्रधान मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ बनवावा लागला." हा देशातील तरुण वर्गाचा आणि विद्यार्थ्यांचा मोठा विजय असल्याचं त्यांनी म्हटलं.

Continues below advertisement

Asaduddin Owaisi On Next PM : '2029 मध्ये देशाचा पंतप्रधान 42-45 वर्षांचा असावा'

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये एमआयएम तरुण उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर संधी देणार असल्याचे ओवैसी यांनी जाहीर केले. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, "2029 च्या लोकसभा निवडणुकीत देशाचे नेतृत्व 80 वर्षांची व्यक्ती करणार नाही, तर 42 ते 45 वर्षांचा तरुण देशाचा पंतप्रधान बनेल असा आमचा प्रयत्न असेल." उत्तर प्रदेश निवडणुकीत आमचे तरुण उमेदवार लोकांचे प्रश्न अत्यंत आक्रमकपणे मांडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Owaisi On Thakurdwara Bulldozer Action : मशिदी-मदरशांवरील कारवाईवरून संताप

उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर ओवैसी यांनी कडाडून टीका केली. ठाकूरद्वारा परिसरातील 36 मशिदी, मदरसे आणि कब्रस्तानांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाने यादी तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. 

Continues below advertisement

अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "आम्ही आता खाली चटईवर बसणार नाही. अखिलेश जर खुर्चीवर बसतील तर आम्ही समोर पाय वर पाय ठेवून बसू आणि आमच्या हक्काची भाषा करू." भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांशी युती करण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Pellet Gun Action At Jantar Mantar : 'पेलेट गन चालवणाऱ्यांवर कारवाई करा'

दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या पेलेट गनच्या वापरावर ओवैसी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या कारवाईत 19 वर्षांचा साहिल, 32 वर्षांची महिला आणि 28 वर्षांच्या तरुणाला पेलेट गनचे छर्रे लागून गंभीर दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या अधिकाऱ्याने आंदोलकांवर पेलेट गन चालवण्याचे आदेश दिले, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

ही बातमी वाचा: