दिल्ली : भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नक्षलवादी म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामींनी केजरीवाल यांना थेट लक्ष केले आहे. केजरीवाल यांना इतर राज्यांचे मुख्यमंत्री पाठिंबा का देत आहेत, असा सवाल देखील स्वामींनी केला आहे.

स्वामी यांनी केजरीवाल यांना राजकारणात काहीच कळत नसल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, अण्णा हजारेंच्या खांद्यावर चढून प्रसिद्धी मिळवत सत्ता मिळाल्यानंतर आता त्यांनांच दुर्लक्ष केले. केजरीवाल हे ४२० असल्याची कोपरखळीही त्यांनी मारली.


गेल्या सात दिवसांपासून विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या राज्यपालांच्या निवासस्थानी ठिय्या मांडून आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केरळचे पी. विजयन आणि कर्नाटकचे एच. डी. कुमारस्वामी हे शनिवारी केजरीवाल यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले असता त्यांना भेट नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी सुनीता यांची भेट घेतली. तसेच केजरीवाल यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

संबंधित बातमी

दिल्लीत राजकीय तणाव वाढला, पंतप्रधान निवासस्थानाला ‘आप’चा घेराव