ई-मेलची कॉपी झळकावत राहुल गांधी म्हणाले की, "आता हे प्रकरण केवळ भ्रष्टाचाराचंच नाही तर गोपनीयतेच्या कायद्याचं उल्लंघनही आहे. गोपनीय माहिती शेअर केल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर खटला चालायला हवा. यात कोणीही वाचू शकणार नाही. जे लोक यात सामील आहेत, त्यांना सगळ्यांना जेलमध्ये जावं लागेल. हे देशद्रोहाचं प्रकरण आहे."
संसदेत आज कॅगचा अहवाल?
कॅगने राफेल कराराशी संबंधित अहवाल सोमवारी (11 फेब्रुवारी) राष्ट्रपती, अर्थ मंत्रालयाला पाठवल्यानंतर तो आता लोकसभा अध्यक्षा आणि राज्यसभेच्या सभापतींकडे पाठवला जाईल. कॅगचा अहवाल आज संसदेत मांडला जाण्याची शक्यता आहे.
UNCUT | राहुल गांधींची संपूर्ण पत्रकार परिषद | नवी दिल्ली | एबीपी माझा
राफेल मुद्द्यावर राहुल गांधींचे पाच आरोप
1. संरक्षण मंत्री, एचएएल आणि परराष्ट्र मंत्री यांना कोणतीही कल्पना नसताना, एखादा करार होत आहे, हे राफेल डीलच्या एमओयूवर स्वाक्षरी होण्याच्या दहा दिवस आधी अनिल अंबानींना कसं समजलं?
2. अनिल अंबानी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. पंतप्रधान येतील तेव्हा अनिल अंबानींचं नाव असलेल्या एमओयूवर स्वाक्षरी होईल, असं अंबानी मीटिंगमध्ये म्हणाले होते.
3. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिल अंबानींचे मिडलमन म्हणून कार करत आहेत.
4. पंतप्रधान मोदींनी गोपनीयतेच्या कायद्याचं उल्लंघन केलं आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात टाकली आहे. मोदींविरोधात कारवाई व्हायला हवी.
5. मोदी राफेल प्रकरण का दाबत आहेत? त्यांना कोणाला वाचवायचं आहे? त्यामुळेच ते राफेल प्रकरणात जेपीसीपासून वाचत आहेत. सीएजीचा अर्थ 'चौकीदार ऑडिटर जनरल' रिपोर्ट आहे. आमचं काम सरकारवर दबाव टाकणं आहे आणि काँग्रेस ताकद पणाला लावून काम करत आहे.