मुंबई : वेदांता समुहाचे ( Vedanta Resources) प्रमुख अनिल अग्रवाल (Anil Agarwal) यांनी गोव्यातील आघाडीच्या निकेल (Nickel produce) आणि कोबाल्ट उत्पादनाच्या निकोमेटची (Nicomet) खरेदी केली आहे. निकोमेट ही जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक संसाधनांच्या समूहांपैकी एक आहे. त्यामुळे वेदांता समूह आता भारतातील निकेलचा एकमेव उत्पादक बनला आहे.


यावर बोलताना अनिल अग्रवाल म्हणाले, "निकेल आणि कोबाल्ट उत्पादनात वेदांता समुहाने प्रवेश केल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. निकेल आणि कोबाल्टच्या उत्पादनामुळे भारत सरकारच्या आत्मनिर्भर मिशनला पाठिंबा मिळणार आहे. निकेल आणि कोबाल्ट हे अत्यंत महत्त्वाचे धातू आहेत. स्टेनलेस स्टील आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) बॅटरी निर्मितीत निकेल आणि कोबाल्टचा उपयोग होतो. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यावर आमचे लक्ष असेल."


महत्त्वाच्या खनिज उत्पादनांमध्ये भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने वेदांता समूहाने पाऊल टाकले आहे असे वेंदांता समूहाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. 


निकेल आणि कोबाल्ट ही भविष्यातील महत्वाची खनिजे म्हणून ओळखले जातात. स्वच्छ उर्जा निर्मितीत ही दोन्ही खनिजे महत्वाची भूमिका बजावतील. अलिकडच्या काही वर्षांमध्ये भारतातील निकेल आणि कोबाल्ट आयातीचे मूल्य सातत्याने वाढत आहे.
 
वेदांता समूहाच्या पुढाकारामुळे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी मुख्य घटक असलेल्या बॅटरीज तयार करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या उच्च-गुणवत्तेच्या पोलाद उत्पादनांच्या उत्पादनास प्रोत्साहन मिळेल. गुणवत्तेच्या ISO 9001 प्रमाणपत्रासह मजबूत R&D फोकस, निकोमेट जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणार्‍या उच्च दर्जाच्या बॅटरी-ग्रेड निकेल सल्फेट क्रिस्टल्सचे प्रमाणित उत्पादक म्हणून पुढे येईल. 


भारताची निकेलची मागणी सध्या 45 KTPA एवढी आहे. ही सर्व मागणी आयातीद्वारे पूर्ण केली जाते. सध्या, निकोमेटचा प्लांट 7.5 KTPA निकेल आणि कोबाल्ट तयार करू शकतो. वेदांता समूह देशाच्या निकेलच्या मागणीपैकी 50 टक्के मागणी पूर्ण करण्यासाठी तायर आहे असे वेदांतच्या निवेदनात म्हटले आहे. 


महत्वाच्या बातम्या


Share Market Crash : शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'; एकाच दिवसात तब्बल 9 लाख कोटी रुपयांचा चुराडा


Share Market : ओमायक्रॉनमुळे मंदीचे सावट? शेअर बाजारमध्ये 'ब्लॅक मंडे'; सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला