Earthquake : भारतासह चार देशांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. अवघ्या तीन तासांत भारत, नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तानच्या अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भारतातील पटना येथील लोकांना आज (28 फेब्रुवारी) पहाटे 2.35 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, त्यानंतर लोक घराबाहेर पडले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.5 इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहाटे 2.35 वाजता नेपाळच्या बागमती प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळचा बागमती प्रांत बिहारमधील मुझफ्फरपूरच्या उत्तरेस 189 किलोमीटर अंतरावर आहे. या भूकंपात अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. या भूकंपाचे धक्के नेपाळमध्येच नव्हे तर शेजारील तिबेटमध्येही जाणवले.
पाकिस्ताना जमीन हादरली
त्याचवेळी पाकिस्तानातही पहाटे 5.14 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी होती. यापूर्वी 16 फेब्रुवारीलाही पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू रावळपिंडीपासून आठ किलोमीटर दक्षिण-पूर्वेला होता. भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. याआधी शुक्रवारी पहाटे 2.48 वाजता तिबेटमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.1 इतकी होती. येथेही या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून 70 किलोमीटर खोलीवर होता.
भूकंप का आणि कसे होतात?
ते वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रवरूप लावा आहे आणि त्यावर टेक्टोनिक प्लेट्स तरंगत आहेत. अनेक वेळा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे, काहीवेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जेव्हा खूप जास्त दाब येतो तेव्हा या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून येणारी उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. जेव्हा यामुळे गोंधळ निर्माण होतो तेव्हा भूकंप होतो.
रिश्टर तीव्रता स्केल 1 ते 9 पर्यंत आहे. भूकंपाची तीव्रता त्याच्या केंद्रस्थानावरून मोजली जाते. म्हणजे त्या केंद्रातून बाहेर पडणारी ऊर्जा या प्रमाणात मोजली जाते. 1 म्हणजे कमी तीव्रतेची ऊर्जा बाहेर येत आहे. 9 म्हणजे सर्वोच्च. अतिशय भयावह आणि विनाशकारी लहर. ते दूर जात असताना ते कमजोर होतात. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7 असेल तर त्याच्या सभोवतालच्या 40 किलोमीटरच्या त्रिज्येत जोरदार धक्का बसतो.
इतर महत्वाच्या बातम्या