मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केला. शाह यांनी गुरुवारी रात्री उद्धव ठाकरेंना फोन करुन एनडीएतील घटकपक्षांच्या बैठकीचं निमंत्रण दिलं.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत भाजपने दिल्लीत पुढील आठवड्यात 10 एप्रिलला एनडीएतील घटकपक्षाची बैठक आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी गुरुवारी रात्री त्यांना फोन करुन निमंत्रण दिलं. साधारण 2 ते 3 मिनिट त्यांच्या संभाषण झालं.
उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण
शिवसेनेची 25 हजार मतं आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे. सेनेच्या भूमिकेवरच राष्ट्रपती कोण होणार हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान बैठकीला उद्धव ठाकरे जाणार की नाहीत, किंवा शिवसेनेतर्फे कोण जाणार याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.