काँग्रेसनं 10 वर्ष पंतप्रधानपदी नमुना बसवला : अमित शाहा
एबीपी माझा वेब टीम | 02 Dec 2017 12:14 AM (IST)
‘काँग्रेसनं पंतप्रधानपदी 10 वर्ष नमुना बसवला.’ असं वक्तव्य भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी केलं आहे.
गांधीनगर : ‘काँग्रेसनं पंतप्रधानपदी 10 वर्ष नमुना बसवला.’ असं वक्तव्य भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी केलं आहे. ते गुजरातमधील एका प्रचार सभेत ते बोलत होते. अमित शाहा नेमकं काय म्हणाले? 'राहुल गांधी विचारत होते की, मोदींनी साडेतीन वर्षात काय केलं त्याचा हिशोब द्या, पण आम्ही पहिली गोष्ट ही केली की, बोलता पंतप्रधान आम्ही निवडून दिला. यांनी तर असा नमुना दिला जो दहा वर्ष बोललाच नाही. मनमोहन सिंह यांना बोलताना तुम्ही ऐकलंत कधी?' अशी टीका अमित शाहांनी आपल्या भाषणातून केली. दरम्यान, अमित शाहा यांच्या टीकेनंतर आता काँग्रेस भाजपला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. VIDEO :