Amazon India Festive Seasonal Jobs : सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने देशभरात 1.5 लाखांहून अधिक (seasonal employment) सिझनल स्वरुपात नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याची मोठी घोषणा ई-कॉमर्स जायंट अमेझॉन इंडियाने जाहीर केले. नोकरीची ही संधी देशातील 400 पेक्षा अधिक शहरांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, लखनऊ, कोची, कोयंबटूर, इंदूर, रायपूर यांचा समावेश आहे.
कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या माध्यमातून देशातील हजारो महिलांना तसेच 2,000 हून अधिक दिव्यांग व्यक्तींना (PWDs) रोजगार देण्यात आला आहे. या सीझनल नोकर्या फुलफिलमेंट सेंटर्स (FCs), सॉर्ट सेंटर्स आणि लास्ट-माईल डिलिव्हरी स्टेशनमध्ये आहेत.
अमेझॉन इंडिया ऑपरेशन्स विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अभिनव सिंह म्हणाले, “या फेस्टिव्ह सीझन जॉब्स अंतर्गत घेतलेले अनेक कर्मचारी सणानंतरही आमच्यासोबत काम सुरू ठेवतात. तसेच दरवर्षी ते परत येतात. आमच्या सर्व ऑपरेशन्समध्ये आम्ही कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि कल्याणाला प्राधान्य देतो.”
अभिनव सिंग यांनी सांगितले की कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स आणि आर्थिक सुरक्षेसह सुरक्षित वातावरण देण्यास कटिबद्ध आहे. अमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणाकरता भारतातील आश्रय केंद्रांची संख्या 100 पर्यंत वाढवली आहे.
यासोबतच कंपनीने फ्री हेल्थ चेकअप उपक्रमाअंतर्गत प्रमुख शहरांमधील 80,000 हून अधिक डिलिव्हरी असोसिएट्ससाठी मोफत आरोग्य तपासणी सेवा सुरू केली आहे. त्यामध्ये डेंटल, BMI, आय चेकअप, फिजिशियन कन्सल्टेशन या सेवा पुरवण्यात येतील. तसेच फुलफिलमेंट सेंटर्समध्ये तातडीच्या मदतीकरिता ऑन-साइट ‘AMCARE’ फर्स्ट-एड सुविधा उपलब्ध आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रोग्रामअंतर्गत कर्मचारी दरमहा पहिल्या 20 दिवसांत त्यांच्या जमा झालेल्या मूळ पगारातील 80 टक्के रक्कम आगाऊ काढू शकतात.