जम्मू : यंदाची वार्षिक अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू होणार आहे. आज जम्मूमध्ये श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे वार्षिक अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. पण, यावर्षी 28 जूनपासून ही यात्रा सुरू होणार आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


हा यात्रा 28 जूनपासून सुरू होणार असून रक्षाबंधनापर्यंत सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, देशभरातून भाविक वर्षभर अमरनाथ यात्रेच्या प्रतीक्षेत असतात. श्री अमरनाथ श्राईन बोर्ड भाविकांसाठी ही यात्रा सुलभ होण्यासाठी व्यवस्था करते.


यात्रेकरुंच्या मुक्काम आणि खाण्यापासून बसेसची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर या प्रवासाच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. या सहलीचा जम्मू-काश्मीरच्या व्यवसायावरही प्रभाव पडतो. व्यापाऱ्यांना या यात्रेकडून मोठ्या आशा आहेत.