नवी दिल्ली: मेडिकलच्या अॅडमिशनसाठी वेगवेगळ्या राज्यात घेतल्या जाणाऱ्या पूर्वपरीक्षा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्या आहेत. या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण देशात मेडिकलच्या अॅडमिशनसाठी 'नीट' म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रान्स टेस्ट ही एकच परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळं 'नीट' ही परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल.

 

यंदाच्या वर्षासाठी नीट परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. 1 मे आणि 24 जुलैला ही परीक्षा घेतली जाईल. 17 ऑगस्टपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. तर 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होईल .

 

यापूर्वी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्या -त्या राज्याची सीईटी परीक्षा द्यावी लागायची. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं वेगवेगळी सीईटी देण्याची डोकेदुखी टळणार आहे.

 

विशेष म्हणजे 2013 मध्ये सुप्रीम कोर्टानंच नीट परीक्षेवर आक्षेप घेतला होता. मात्र एका एनजीओच्या याचिकेनंतर आता सुप्रीम कोर्टानंच नीटच्या आवश्यकतेवर शिक्कामोर्तब केलं आहे.