एक्स्प्लोर

India Weather Forecast : मुसळधार पाऊस अन् वादळी वाऱ्याचं संकट; हवामान विभागाकडून 15 राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा; दिल्ली आणि यूपी-बिहारसह कसे असेल महाराष्ट्राचे हवामान?

देशभरातील हवामान पुन्हा एकदा बदलत असल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने बिहार, झारखंड, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह १५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

All India Weather Forecast : देशभरातील हवामान (India Weather) पुन्हा एकदा बदलत असल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने बिहार, झारखंड, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह 15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा (Weather Updates Today) दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राजधानी दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह 15 राज्यांमध्ये 17 मे रोजी मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. या काळात अनेक भागांमध्ये ताशी 75 किमी वेगापर्यंत सोसाट्याचा वारा अपेक्षित आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्येही तीव्र वादळांची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने 17 आणि 17 मे रोजी दिल्लीत धुळीची वादळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. रात्री हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. आज तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर 18 मे रोजी कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. 21 मे रोजी कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील.

उत्तर प्रदेशातील हवामान (Weather in Uttar Pradesh)

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तीव्र उष्णता जाणवत आहे. बांदामध्ये पारा 44.8 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रयागराज आणि झाशीमध्येही तीव्र उष्णता जाणवत आहे. येथेही कमाल तापमान 44 अंशांपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशात कोरडे हवामान अपेक्षित आहे. आज राजधानी लखनौ आणि आसपासच्या परिसरात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

राजस्थान हवामान (Rajasthan weather)

राजस्थानच्या बहुतांश भागांमध्ये तापमान वाढू लागले आहे. जयपूर येथील आयएमडी केंद्राच्या अंदाजानुसार, राज्यात 17 मे पासून तापमान पुन्हा वाढणार आहे. १17-18 मे रोजी बिकानेर विभाग, शेखावती प्रदेश, जयपूर आणि भरतपूर विभागाच्या उत्तर भागातील अनेक ठिकाणी जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, हलक्या पावसाचीही शक्यता आहे.

बिहारमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा (Indication of rain and storm in Bihar)

गया, जहानाबाद, औरंगाबाद, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, भागलपूर, पूर्णिया, मुंगेर, रोहतास, कैमूर, गया, दरभंगा, मधुबनी, भागलपूर, कटिहार आणि बेगुसराय येथे मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पाटणामध्ये 17-18 मे रोजी कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

हिमाचल हवामान (Himachal Weather Update)

17-18 मे रोजी हिमाचल प्रदेशातील कांग्रा, सोलन, कुल्लू, शिमला आणि चंबा येथे ढगाळ आकाश राहील. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 40 किलोमीटरपर्यंत असू शकतो. 17 आणि 18 मे रोजी मनालीमध्ये कमाल तापमान 11 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 1 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम तामिळनाडूमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत. या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 18 मे रोजी दिंडीगुल, थेनी, कोईम्बतूर आणि निलगिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merge into Congress: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या घडामोडींना वेग? नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, एअरपोर्टवर म्हणाले...
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या घडामोडींना वेग? नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, एअरपोर्टवर म्हणाले...
Iran War Aditya Sharma Death: नियतीचा उलटफेरा, युद्धाचं समर्थन करणाऱ्या बापाची आपल्याच लेकाला शेवटचं बघण्यासाठी याचना! ओमानच्या जहाजावरील हल्ल्यानंतर आदित्य शर्माच्या वडिलांची पोस्ट चर्चेत
नियतीचा उलटफेरा, युद्धाचं समर्थन करणाऱ्या बापाची आपल्याच लेकाला शेवटचं बघण्यासाठी याचना! ओमानच्या जहाजावरील हल्ल्यानंतर आदित्य शर्माच्या वडिलांची पोस्ट चर्चेत
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
NCP Merge into Congress: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या घडामोडींना वेग? नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, एअरपोर्टवर म्हणाले...
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या घडामोडींना वेग? नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, एअरपोर्टवर म्हणाले...
Maharashtra Live blog updates: मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी पट्टी कोसळून नागरिक जखमी; मिरा-भाईंदर रोडवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी पट्टी कोसळून नागरिक जखमी; मिरा-भाईंदर रोडवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Embed widget