अलाहाबाद : दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितच्या कारनाम्यानंतर, साधू-संतांची प्रतिमा मलिन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेने भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितसह, उत्तर प्रदेशमधील बस्तीच्या सचिदानंद सरस्वती आणि अलाबादच्या त्रिकाल भवंता यांच्या नावाचा समावेश आहे.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 13 आखाड्याचे प्रमुख सहभागी होते. या बैठकीनंतर महंत नरेंद्र गिरी यांनी भोंदू बाबांपासून सावध राहण्याचं आवाहन करताना सांगितलं.

विशेष म्हणजे, राजस्थानच्या अलवरचे फलाहारी बाबांनाही आखाडा परिषदेतून निलंबित केल्याची घोषणा गिरी यांनी यावेळी केली. शिवाय, आखाडा परिषदेच्या या बैठकीत 2019 मध्ये प्रयागमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्याच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

नव्या यादीतील भोंदू बाबांचा परिचय

बाबा वीरेंद्र दीक्षित

बाबा वीरेंद्र दीक्षित राजधानी दिल्लीत 'आध्यात्मिक यूनिव्हर्सिटी' नावाने एक आश्रम चालवत होता. या आश्रमातून तरुण मुली आणि महिलांचं लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप आहे. यात पोलिसांनी बाबाच्या एकूण पाच आश्रमतून 150 तरुणी आणि महिलांची सुटका केली आहे. सध्या बाब वीरेंद्र दीक्षित फरार असून, दिल्ली हायकोर्टाने त्याला 4 जानेवारीपर्यंत हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

सचिदानंद सरस्वती

बाबा सचिदानंद सरस्वती आपल्या संत कुटिल आश्रमात धर्म प्रसाराच्या नावावर 20 वर्षांपासून तरुणींना शिष्य बनवत होता. त्यानंतर, त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल आहे.

त्रिकाल भवंता

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्याची मूळ रहिवासी असलेली त्रिकाल भवंता ऊर्फ अनीता शर्माने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काहीकाळ अलाहबादमधील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम केलं. यानंतर अलाबादमधील दारागंजमध्ये स्वत: चं क्लीनिक सुरु केलं. जवळपास 20 वर्षांपूर्वी तिचं लग्न अलाहबादमधील राम शर्मा नावाच्या एका शिक्षकासोबत लग्न झालं. तिला एक मुलगा रवी शर्मा आणि एम मुलगी अपराजिता शर्मा अशी दोन मुलं आहेत. हे दोघेही अलाहबाद जळच्या शहरात शिक्षण घेत आहेत.

नाशिकमधील कुंभ मेळ्यात तिने महिलांचा स्वतंत्र आखाडा बनवून धर्माचार्यांनाच आव्हान दिलं होतं. यानंतर ती सर्वाधिक चर्चेत राहिली होती.

दरम्यान, यापूर्वी आखाडा परिषदेने 10 सप्टेंबर रोजी 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. या यादीत आसाराम बापू, गुरमीत राम रहीम, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, सच्चिदानंद गिरी, ओमबाब ऊर्फ विवेकानंद झा, नर्मल बाबा, स्वामी असीमानंद, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमूर्ती द्विवेदी, ओम नम: शिवाय बाबा, नारायण साई, रामपाल, कुश मुनी, मलखान गिरी, आणि बृहस्पती गिरी आदींचा समावेश होता.

त्यातच आता नवी यादी जाहीर केली असून, यात दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितसह, उत्तर प्रदेशमधील बस्तीच्या सचिदानंद सरस्वती आणि अलाबादच्या त्रिकाल भवंता यांच्या नावाचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

भोंदू बाबांची दुसरी यादी लवकरच, नव्या यादीत कोण कोण?

भोंदू बाबांची यादी जारी करणाऱ्या आखाडा परिषदेचे महंत मोहनदास बेपत्ता! 

आखाडा परिषदेकडून देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर

भोंदू बाबांची यादी जारी करणाऱ्या आखाडा परिषदेचे महंत मोहनदास बेपत्ता! 

माझा विशेष : भोंदू बाबांची पैदास रोखण्यासाठी धर्मसंस्था अपयशी आहे?