Airports Re-opoened : भारतीय हवाई दलाच्या सूचनेनुसार भारतीय हवाई क्षेत्र आता पूर्णपणे उघडण्यात आली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान बंद असलेली 32 विमानतळेही आता उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने म्हटले आहे की, प्रवाशांच्या लक्ष वेधण्यासाठी 15 मे 2025 रोजी सकाळी 5.29 वाजेपर्यंत 32 विमानतळे नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी तात्पुरती बंद करण्याची सूचना जारी करण्यात आली होती. मात्र, आता ही विमानतळे तात्काळ नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहेत.

या कालावधीत, प्रवाशांना नियमित अपडेटसाठी एअरलाइन्सच्या वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा आणि एअरलाइन्सशी थेट संपर्क साधून त्यांच्या फ्लाइटची स्थिती जाणून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळं केवळ हवाई वाहतूक कमी होण्यास मदत होणार नाही तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही फायदा होणार आहे.

7 मे रोजी भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला, ज्यामध्ये 26 निष्पाप लोक मारले गेले होते. यातील बहुतेक पर्यटक होते. भारतीय सैन्याच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्ताननेही नियंत्रण रेषा आणि सीमेपलीकडे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले केले. हे लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून, निर्बंध शनिवारी सकाळपर्यंत लागू राहणार होते, परंतु नंतर, वाढत्या तणावामुळे, ते 15  मे वाढवण्यात आले.

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतरचा हा निर्णय, पूर्वी प्रतिबंधित असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये सामान्य विमान वाहतूक क्रियाकलाप पुनर्संचयित करण्याचे संकेत देत आहे. या निर्णयामुळे हवाई वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना फायदा होईल. ऑपरेशन सिंदूर' नंतर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक विमानतळं तात्पुरती बंद करण्यात आली होती. 200 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा, जामनगर आणि इतर अनेक विमानतळ बंद करण्यात आली होती. एकट्या इंडिगोने त्यांच्या 160 ते 165  नियोजित विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दरम्यान, आता देशातील तात्पुरती बंद करण्यात आलेली  32 विमानतळांची सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

विमानसेवा सुरु झालेल्या विमानतळांची यादी

अधमपूरअंबालाअमृतसरअवंतीपूरभटिंडाभुजबिकानेरचंदीगडहलवाराहिंडनजैसलमेरजम्मूजामनगरजोधपूरकांडलाकांगडा (गग्गल)केशोडकिशनगडकुल्लू मनाली (भुंटर)लेहलुधियानामुंद्रानळ्यापठाणकोटपटियालापोरबंदरराजकोट (हिरासर)सारसावाशिमलाश्रीनगरथोइसउत्तरलाई

महत्वाच्या बातम्या:

ऑपरेशन सिंदूरनंतर 200 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द, 18 विमानतळं तात्पुरती बंद