Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये (Air India Plane Crash In Ahmedabad) एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील 24 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते आहे. यात महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश आहे. दरम्यान विमानानं धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदामध्ये होत्याचं नव्हतं झालं. विमानाच्या टेकऑफनंतर 50 सेकंदांमध्ये हा भीषण अपघात झाला.
अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात असेल. टेक ऑफ नंतर आवश्यक उंचीवर विमान जात नाहीय हे वैमानिक सुमीत सभरवाल यांच्या लक्षात आल, त्यांनी 'मे-डे कॉल' केला, म्हणजे विमान संकटात आहे असा संदेश हवाई वाहतूक यंत्रणेला पाठवला. पण कोणतीही मदत मिळण्याच्या आत सगळा खेळ अवघ्या 50 सेकंदात संपला. विमानाचा अपघात नेमका का झाला?, याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र या दुर्घटनेची चार संभाव्य कारणं व्यक्त केली जात आहे.
एअर इंडिया विमान दुर्घटनेची चार संभाव्य कारणं-
1) विमानाच्या दोन्ही इंजिनात एकाच वेळी बिघाड झाला असावा...
2) लँडिंग गियर टाकता आला नसावा, लँडिंग गियर वेग कमी करतो...
3) पक्ष्याची विमानाला धडक बसली असावी...
4) टेक ऑफला मदत करणारे विमानाच्या पंखांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत...
महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू-
महाराष्ट्रातील 10 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे. मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल हे मुंबईत पवई इथले आहेत. क्रू मेंबर अपर्णा महाडिक गोरेगावच्या तर साईनीता चक्रवर्ती जुहूच्या तर रहिवासी आहेत. क्रू मेंबर रोशन सोनघरे या डोंबिवलीकर आहेत. तर दीपक पाठक हे बदलापूरचे आहेत. मैथिली पाटील पनवेलजवळील न्हावा गावच्या आहेत. प्रवाशांपैकी आशा पवार आणि महादेव पवार दाम्पत्य हे पंढरपूरचे रहिवासी आहेत. तर मयूर पाटील या रहिवाशाची अजून माहिती समजलेली नाही. तर यशा कामदार या नागपूरच्या आहेत.
अहमदाबाद विमान दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उघड, VIDEO:
संबंधित बातमी:
Gujarat Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटना, 5 मुद्द्यात समजून घ्या नेमकं काय घडलं?