Air India Plane Crash Ahmedabad : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात (Air India Plane Crash Ahmedabad ) झाला आहे. या अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 16 जणांचा समावेश आहे. दरम्यान, या अपघाताचे कारण अद्याप समजलेले नाही. दरम्यान, तुम्हाला जगातील काही ठिकाणाहून हवेत उडालेली विमाने गायब झाल्याबाबतची माहिती आहे का? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. या विमानातील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता. या संपूर्ण अपघातातून एक व्यक्ती वाचली, ज्यावर उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत किती विमाने झाली गायब?
1) 2014 मध्ये, मलेशिया एअरलाइन्सचे विमान MH370 क्वालालंपूरहून बीजिंगला निघाले होते. या विमानात एकूण 239 प्रवासी होते. उड्डाणादरम्यान, ते व्हिएतनामच्या हवाई हद्दीतून जात होते आणि नंतर त्याचा संपर्क तुटला. आजपर्यंत ते विमान सापडलेले नाही. याबाबतची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
2) 1962 मध्ये, फ्लाइंग टायगर लाईन फ्लाइट 739 ने 93 अमेरिकन सैनिक आणि 11 क्रू मेंबर्ससह उड्डाण केले होते. हे विमान पॅसिफिक महासागरात गायब झाले आहे. ते फिलीपिन्सला जात होते. आजपर्यंत त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही.
3) 30 जानेवारी 1948 रोजी, ब्रिटिश साउथ अमेरिकन एअरवेजचे विमान स्टार टायगरने पोर्तुगालच्या अझोर बेटावरून 25 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्ससह बर्म्युडासाठी उड्डाण केले होते. परंतु ते तिथे पोहोचताच त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. त्यानंतर त्या विमानाबाबत आजपर्यंत कोणतीही माहिती किंवा पुरावा मिळालेला नाही. या अपघातानंतर
4) 17 जानेवारी 1949 रोजी अमेरिकन एअरवेजचे विमान स्टार एरियल गायब झाले होते. 13 प्रवाशांव्यतिरिक्त, 7 क्रू मेंबर्स या विमानात होते. आजपर्यंत या विमानाबाबात कोणतीही माहिती मिळाली नाही.
5) 5 डिसेंबर 1945 रोजी, फ्लोरिडा येथील त्याच्या तळावरून 14 वैमानिकांसह एक नियमित प्रशिक्षण उड्डाण झाले, परंतु काही काळानंतर त्याचा बेस स्टेशनशी संपर्क तुटला. त्याचा शोध घेण्यासाठी विमाने पाठवण्यात आली, परंतु काहीही सापडले नाही.
6) 2 जुलै 1955 रोजी फ्लाइट 914 ने न्यू यॉर्कहून मियामीला उड्डाण केले. परंतू, हे विमान देखील हवेत गायब झाले आहे. या विमानात एकूण 57 प्रवासी होते.
7) काही दिवसांपूर्वी अलास्कामध्ये 10 जणांना घेऊन जाणारे एक विमान अचानक हवेत गायब झाल्याची बातमी आली होती. ते अद्याप सापडलेले नाही.
महत्वाच्या बातम्या: