मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा फटका आता विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही बसणार आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या दरात झालेल्या मोठ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने विमान तिकिटांवर इंधन अधिभार (Fuel Surcharge) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा अधिभार 12 मार्च 2026 पासून टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर या निर्णयाचा परिणाम होणार असून तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता आहे.
ATF Price Rise : जेट इंधन दरवाढीचा परिणाम
मार्च 2026 च्या सुरुवातीपासून एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. विमान कंपन्यांच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात इंधनाचा वाटा जवळपास 40 टक्के असतो. पुरवठ्यातील अडथळे आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधनाचा खर्च झपाट्याने वाढत असल्याचे एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Air India Fuel Surcharge Phase 1 : 12 मार्चपासून पहिला टप्पा
12 मार्चपासून लागू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात खालीलप्रमाणे इंधन अधिभार आकारला जाणार आहे.
- देशांतर्गत उड्डाणांवर प्रति तिकीट 399 रुपये अधिभार
- SAARC देशांसाठी देखील 399 रुपये अधिभार
- पश्चिम आशिया मार्गांवर 10 डॉलर्स रुपये
- दक्षिण-पूर्व आशियासाठी 60 डॉलर्स रुपये
- आफ्रिका मार्गांवर 90 डॉलर्स रुपये
Air India Fuel Surcharge Phase 2 : 18 मार्चपासून दुसरा टप्पा
18 मार्चपासून लागू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात लांब पल्ल्याच्या उड्डाणांवर अधिक अधिभार आकारला जाणार आहे.
- युरोप मार्गांवर 125 डॉलर्स
- उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मार्गांवर 200 डॉलर्स
Air India Far East Routes: पूर्वेकडील मार्गांसाठी अधिभार लवकरच
हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया या पूर्वेकडील मार्गांसाठी किती अधिभार आकारला जाईल याबाबतचा निर्णय पुढील काळात जाहीर केला जाईल, अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. जेट इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर इतर विमान कंपन्याही अशाच प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही बातमी वाचा:
