Air India Flight Turbulence: थायलंडमधील फुकेटहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2379 या विमानाला आज (4 ऑगस्ट) अचानक तीव्र हवेच्या धक्क्यांचा (टर्ब्युलन्स) सामना करावा लागला. या धक्क्यांमुळे विमान काही क्षणांसाठी अचानक खाली आले. मात्र, वैमानिकांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवले. या घटनेत काही प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. (Thailand to New Delhi Air India Flight Turbulence)
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व 134 प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून किरकोळ जखमी झालेल्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावरील वैद्यकीय केंद्रात तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, एअर इंडियाची वैद्यकीय टीम त्यांची देखभाल करत आहे. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. (Air India Flight Turbulence Marathi News)
विमानातील प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग- (Air India Flight Turbulence)
एका प्रवाशाने सदर घटनेचा थरारक प्रसंग सांगितलं. विमान उड्डाण करून दीड तास झाला होता. पहाळची वेळ होती आणि आम्ही विमानात झोपलो होतो. विमान चालत असताना अचानक थांबले, वळले आणि उलटे-सुलटे झाले. ते 2-3 मिनिटे असेच फिरत राहिले. यात 15-20 प्रवासी जखमी झाले. विमानात 100 हून अधिक लोक होते. 70 ते 80 टक्के लोक जखमी झाले. आम्ही एअर इंडियाविरुद्ध नक्कीच तक्रार करणार आहोत, असं विमानातील एका प्रवाशाने सांगितले.
स्वच्छ आकाशातही टर्ब्युलन्स कसा होतो? (Air India Flight Turbulence)
एअरलाइनच्या सूत्रांनुसार, विमान दिल्लीत उतरण्याच्या तयारीत असताना ते अचानक 'क्लिअर एअर टर्ब्युलन्स' (Clear Air Turbulence) च्या विळख्यात सापडले. हा असा हवेचा धक्का असतो, जो पूर्णपणे स्वच्छ आकाशात, कोणतेही ढग, पाऊस किंवा वादळ नसताना अचानक जाणवतो. त्यामुळे वैमानिकांनाही त्याचा पूर्वीच अंदाज येणे अत्यंत कठीण असते.
विमानालाही किरकोळ नुकसान- (Air India Flight Turbulence)
सूत्रांच्या माहितीनुसार, या तीव्र धक्क्यांमुळे विमानाचेही किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र, सर्व सुरक्षा प्रक्रियांचे पालन करत विमानाने दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. त्या वेळी हवामान सामान्य दिसत असले तरी, वातावरणातील हवेच्या प्रवाहात अचानक झालेल्या बदलामुळे विमानाला जोरदार धक्के बसल्याचे सांगितले जात आहे.
