चुरु (राजस्थान): अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना ताजी असतानाच राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागातील भानुदा गावात आज भारतीय हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाची पथकं तातडीनं घटनास्थळी रवाना झाली आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार आकाशात मोठा आवाज झाल्यानंतर शेतामध्ये आग आणि धूर पाहायला.
विमान क्रॅश झाल्यानंतर घटनास्थळी दोन मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेहाची स्थिती देखील खराब असल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून मृताची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच रतनगढमधील स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे. भारतीय हवाई दलातील दुर्घटनाग्रस्त विमान जग्वार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जिल्हाधिकारी अभिषेक सुराना आणि स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाली आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान क्रॅश झाल्यानंतर शेतामध्ये आग लागली होती. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. आग विझवण्यास सुरुवात केल्यानंतर एक मृतदेह सापडला, त्यानंतर आग विझवण्याचं काम सुरुच ठेवल्यानंतर दुसरा मृतदेह देखील सापडल्याची माहिती आहे.
भारतीय हवाई दलाचं विमान का कोसळलं यासंदर्भातील सविस्तर कारण नंतर स्पष्ट होईल. स्थानिकांच्या माहितीनुसार एक विमान झाडावर पडलं. त्यामुळं ते झाड देखील पूर्णपणे जळून गेलं आहे. ज्या भागात विमान कोसळलं तो भाग वाळवंटाचा आहे.
प्राथमिक माहितीनुसार भारतीय हवाई दलात 160 जग्वार विमानं आहेत. त्यापैकी 30 विमानांचा वापर प्रशिक्षणासाठी केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार सुरतगढहून विमान
चुरुचे पोलीस अधीक्षक जय यादव यांच्या माहितीनुसार सैन्य दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं. ते विमान झाडावर कोसळलं,त्यामुळं झाड देखील जळून गेलं. या ठिकाणी दोन मृतदेह आढळतात.दुर्घटनास्थळी हवाई दलाचं पथक दाखल झालं आहे. विमानाचा मलबा एकत्र करण्याचं काम केलं जात आहे.
तीन महिन्यांमधील दुसरी घटना
भारतीय हवाई दलातील जग्वार विमान कोसळण्याची ही गेल्या तीन महिन्यांमधील दुसरी घटना आहे. तीन महिन्यांपूर्वी जामनगर एअर फोर्स स्टेशनवरुन प्रशिक्षणासाठी या विमानानं उड्डाण घेतलं होतं. ते विमान सुवरद गावात कोसळलं होतं. जामनगर शहरापासून ते गाव 12 किमी अंतरावर होतं. त्यावेळी एका पायलटचा मृत्यू झाला होता, तर एक जण बचावला होता.