Air India Plane Crash : प्लेन जळून खाक, उरला फक्त सांगाडा; तरी जशीच्या तशी राहिली 'भगवद्गीता', व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
Ahmedabad Air India Plane Crash Bhagavad Gita Video : या घटनेने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणले. जिथे सर्व काही राख झाले, तिथे भगवद्गीता मात्र एकही पान न जळता शाबूत आहे.

Ahmedabad Air India Plane Crash Viral Video : अहमदाबादमध्ये घडलेल्या विमान अपघाताने संपूर्ण जग हादरून गेले आहे. या दुर्घटनेत 265 जणांनी प्राण गमावले. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडक दिल्यानंतर हे विमान काही सेकंदांतच जळून खाक झाले.
व्हायरल व्हिडिओमध्ये आहे तरी काय ?
या भीषण अपघातानंतर सुरू झालेल्या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अनेक भयावह दृश्ये समोर आली. याच दरम्यान सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रेस्क्यू टीमला घटनास्थळी एक 'भगवद्गीता' सापडते.
विशेष म्हणजे, पूर्ण विमान जळून कोळसा झाला असतानाही ही 'भगवद्गीता' अक्षरशः जशीच्या तशी राहिली. या गीता ग्रंथाची पानेही सुरक्षित आहेत. ती व्यक्ती भगवद्गीतेचे प्रत्येक पान उलटून ते दाखवत आहे. या व्हिडिओमध्ये गुजराती भाषेत लिहिले आहे की विमान अपघातात विमान पूर्णपणे जळून खाक झाले. पण भगवद्गीतेला काहीही झाले नाही. हा व्हिडिओ बिहारमधील एका प्रसिद्ध युट्यूबरने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
काय केला जात आहे दावा ?
बिहारमधील प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यप यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. मनीष कश्यप यांनी लिहिले आहे की, विमानात एक प्रवासी भगवद्गीता घेऊन प्रवास करत होता. या घटनेने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणले. जिथे सर्व काही राख झाले, तिथे भगवद्गीता मात्र एकही पान न जळता शाबूत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो खरा आहे की नाही याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पण जर ते खरे असेल तर ते चमत्कारापेक्षा कमी नाही.
विमान में एक यात्री भागवत गीता लेकर सफर कर रहे थे
— Manish Kasyap Son Of Bihar (@ManishKasyapsob) June 13, 2025
भगवत गीता बिल्कुल सही सलामत प्लेन के मलबे में मिला है#AhmedabadPlaneCrash #Gujarat #GujaratPlaneCrash #AirIndiaPlaneCrash
#AirIndiaFlightCrash
Managed By - Team pic.twitter.com/Jo0iW352jy
विमानात 242 लोक करत होते प्रवास...
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या या विमानात 242 लोक होते. त्यापैकी 12 जण क्रू मेंबर्स होते. या अपघातात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा जीव वाचला, अपघातात वाचलेल्या व्यक्तीचे नाव विश्वास कुमार रमेश आहे. विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. या अपघातात मेडिकल कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
हे ही वाचा -
Before You Go
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही





















