Sugar Production : यावर्षी देशात साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) घट झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात आत्तापर्यंत साखरेच्या उत्पादन सहा टक्क्यांची घट झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्माने (ISMA) याबाबतची माहिती दिली आहे. 15 एप्रिलपर्यंत देशात साखरेचे उत्पादन हे सहा टक्क्यांनी घटून 3 कोटी 11 लाख टनांवर आलं आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये साखरेचं उत्पादन कमी
महाराष्ट्र हे देशातील साखर उत्पादनाचे मोठे राज्य आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात ऊसाचे गाळप केले आहे जाते. मात्र, यावर्षी साखरेच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्रात 1 कोटी 26.5 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. ते यावर्षी 1.5 कोटी दशलक्ष टनांवर आलं आहे. यावर्षी मोठी घट झाली आहे. तर कर्नाटकातील साखरेचे उत्पादन 58 लाख टनांवरुन 55.3 लाख टनांवर आले आहे. म्हणजे या दोन्ही प्रमुख साखर उत्पादन करणाऱ्या राज्यात मोठी घट झाल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये साखरेच्या उत्पादनात वाढ
इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्माने दिलेल्या आकडेवारीवरीनुसार उत्तर प्रदेश साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. गेल्या हंगामात उत्तर प्रदेशमध्ये 94.4 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यावेळी 1 ऑक्टोबर 2022 ते 15 एप्रिल 2023 पर्यंत 96.6 लाख टन साखरेचं झालं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखरेच्या उत्पादनात घट होत असली तरी उत्तर प्रदेशमध्ये मात्र, साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
यंदा उत्पादन 18 लाख टनांनी कमी होणार
यावर्षी देशात 3.40 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होऊ शकते, असा अंदाज ISMA ने व्यक्त केला आहे. तर गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन हे 3.58 दशलक्ष टन झाले होते. साखर उत्पादनात झालेली घट ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. ब्राझीलनंतर भारत हा जगातील दुसरा साखर उत्पादक देश आहे. यंदा बदलत्या वातावरणाचा देखील ऊस उत्पादनालाफटका बसला आहे. पाऊस (Rain Updates) काळ जास्त झाल्यानं ऊसाची (Sugarcane) वाढ पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळं ऊसाच्या उत्पादनात घट झाली आहे. याचा परिणाम साखरेचा उत्पादनावर (Sugar Production) झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: