After Mohit end his life his mother and sister also died : मुंबईतून गावाकडे गेल्यानंतर तरुणाने राहत्या घरीच गळ्याला दोरी लावून आत्महत्या केली. वयाची पंचविशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलाने अशा पद्धतीने आयुष्य संपवल्याने भयभीत होऊन गेलेल्या आईने मृतदेहाला चिकटून अर्धा तास आक्रोश केला. मला सोडून जाऊ शकत नाहीस, तुझं लग्न करायचं होतं म्हणत तिने आक्रोश केला. बहिणीने सुद्धा एकच आक्रोश केला. यानंतर दोघींनी सुद्धा विष प्राशन केले. विषाचा अंश शरीरात पसरू लागताच वेदनेने ओरडू लागल्यावर शेजाऱ्यांना दोघींचा आवाज ऐकू आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज (1 मे) गुरुवारी सकाळी आईचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मोहित कन्नौजिया असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे वडील अंगद कन्नौजिया यांचे अनेक वर्षांपूर्वी निधन झालं आहे. मोहित मुंबईत काम करत होता. तो फक्त सात दिवसांपूर्वीच गावी आला होता. बुधवारी तो आई कौशल्या देवी आणि बहीण सुप्रियासोबत औषध घेण्यासाठी हरपूरला जात होता. यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाल्याचे समजते. ही घटना गोरखपूरमधील हरपूर बुधत परिसरातील कुचदेहरी येथील आहे.
आणि मोहित लटकलेला आढळला
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार औषध घेण्यासाठी गेल्यानंतर मोहितचा आईशी कशावरून तरी वाद झाला. त्यानंतर मोहित रागावला आणि घरी परतला. आईने विचारले की तू कुठे जात आहेस, तो म्हणाला, मला जायचं नाही. मग आई आणि बहीण पुढे निघून गेल्या. मोहितने घरी परतल्यानंतर टॉवेलचा फास बांधला आणि पंख्याला अडकवला. त्यानंतर त्याने स्वतःला गळफास लावला. आई आणि बहीण औषध घेऊन घरी परतल्यावर त्यांनी दार ठोठावले, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावले आणि मोहित लटकलेला आढळला. त्या छतावरून आत गेल्या. त्यानंतर दोघींनाही धक्का बसून विष प्राशन केले. गावकऱ्यांनी सांगितले की मोहितच्या मृत्यूनंतर आई कौशल्या देवी आणि बहीण सुप्रिया मृतदेहाजवळ बसल्या आणि रडू लागल्या. यानंतर, आई मोहितच्या मृतदेहाला चिकटून राहिली. ती म्हणू लागली, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस, मला तुझे लग्न करायचं आहे. ती मृतदेहापासून दूर जात नव्हती. गावकऱ्यांनी समजावत बाजूला केले.
एसपी म्हणाले, हा वादाचा विषय
घटनेची माहिती मिळताच पोलिस पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आई आणि मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. रात्री उशिरा डॉक्टरांनी सुप्रियाला मृत घोषित केले. तर गुरुवारी आई कौशल्या देवी यांचाही मृत्यू झाला. उत्तर एसपी जितेंद्र कुमार श्रीवास्तव म्हणाले की, कौटुंबिक वादातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी पोहोचल्यानंतर त्याच्या आई आणि बहिणीनेही त्याला पाहून विष प्राशन केले. कालच उपचारादरम्यान त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. सकाळी आईचाही मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या