आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या रडारवर असलेले पी. चिदंबरम गेल्या 27 तासांपासून बेपत्ता होते. ते थेट आज रात्री माध्यमांसमोर आले. त्यांनी रात्री 8.15 वाजता नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. अवघ्या सहा मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांचे खंडन केले.
चिदंबरम माध्यमांसमोर येताच सीबीआयचं पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात पोहोचलं. परंतु चिदंबरम सीबीआयच्य़ा हाती लागले नाहीत. उलट ते घरी पळाले. सीबीआयसोबतच ईडीची टीम चिदंबरम यांच्या निवासस्थानी पोहोचली. परंतु सीबीआयला चिदंबरम यांच्या घरात जाण्याची परवानगी मिळाली नाही. परिणामी सीबीआयच्या पथकाला चिदंबरम यांच्या घराच्या प्रवेशद्वारावरुन (गेवटवरुन), भिंतीवरुन उड्या मारुन घरात प्रवेश करावा लागला आहे. त्यानंतर सीबीआयच्या टीमने चिदंबरम यांना ताब्यात घेतले. रात्री 10.15 वाजता चिदंबरम यांना अटक झाली.
27 तासांनंतर पी. चिदंबरम माध्यमांसमोर, म्हणाले माझ्यावरील आरोप खोटे
चिदंबरम यांनी त्यांच्या घराचा दरवाजा न उघडल्याने सीबीआयनं अक्षरशः कसरत करुन निवासस्थानाच्या गेटवर चढून निवासस्थानी प्रवेश केला. दरम्यान यामुळे निवासस्थानाबाहेर परिस्थिती चिघळली होती. चिदंबरम यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले होते. काँग्रेस कार्यकर्ते सीबीआय आणि ईडीच्या कारवाईत अडथळा आणत होते. कार्यकर्त्यांनी राडा सुरु केल्यानंतर सीबीआयने दिल्ली पोलिसांकडे मदत मागितली. दिल्ली पोलिसांनी या राडा करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.
चिदंबरम यांच्या घराबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा, गेटवरुन उड्या मारुन सीबीआय पथक घरात
दरम्यान 27 तासानंतर पी. चिदंबरम काँग्रेस कार्यालयात अवतरले आणि आयएनएक्सप्रकरणी आपल्यावर कुठलाही आरोप नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्याशिवाय आपला आणि आपल्या कुटुंबियांवर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचेही त्यांनी सांगितले.
चिदंबरम यांनी अवघी 10 मिनिटं पत्रकार परिषद घेतली. परंतु पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणं त्यांनी टाळलं. चिदंबरम कार्यालयातून घराकडे निघाले आणि इतक्यात सीबीआयचं पथक काँग्रेस कार्यालयात पोहोचलं. मात्र चिदंबरम सीबीआयच्य़ा हाती लागले नाहीत. उलट ते घरी पळाले. आता त्यांच्या घराबाहेर मोठा राडा सुरु आहे.
पाहा काय म्हणाले पी. चिदंबरम