नवी दिल्ली: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात त्याला हद्दपार करण्यासाठी 'गो कोरोना, कोरोना गो' असा नारा देणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या धोक्याची छाया जगावर पसरत असताना एक नवीन नारा दिलाय, 'नो कोरोना, कोरोना नो.' नव्या कोरोना स्ट्रेनचा भारतात शिरकाव होऊ नये यासाठी हा नारा दिल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलंय.


काय आहे नवा स्ट्रेन?
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. तो मूळच्या कोरोनापेक्षा 70 टक्के अधिक प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे काळजी म्हणून भारतासह अनेक देशांनी ब्रिटनसोबतच्या आपल्या विमानसेवांना स्थगिती दिली आहे. आता अशा प्रकारचा दुसरा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतही सापडला आहे. त्यामुळे जगासमोरची डोकेदुखी वाढली आहे.


जपानने यावर कडक पाऊले उचलत सर्व विदेशी नागरिकांच्या प्रवेशावर प्रतिबंध घालण्याची घोषणा केली आहे. भारतातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला प्रतिबंध घालण्यासाठी कडक पाऊले उचलली जात आहेत. त्यामध्ये गेल्या महिन्याभरात ब्रिटनवरुन भारतात आलेल्या प्रवाशांची माहिती घेण्याचं सुरु असून त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येत आहे.


यासंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नवी नियमावली जाहीर केली असून त्यानुसार नियोजन केलं जात आहे. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या 4 आठवड्यांच्या दरम्यान ब्रिटनहून भारतातील विविध राज्यात आलेल्या सर्व प्रवाशांची माहिती घेण्याचे निर्देश ब्युरो ऑफ इमिग्रेशनला देण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन या प्रवाशांची माहिती संबंधित राज्यांना देणार आहे. 25 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या दरम्यान भारतात आलेल्या प्रवाशांची माहिती जिल्हा सर्व्हेक्षण अधिकाऱ्यांमार्फत घेण्यात येईल. अशा प्रवाशांमध्ये काही लक्षणं दिसत असतील तर त्यांची RT-PCR चाचणी घेण्यात येईल.


महत्वाच्या बातम्या: