Baba Ram Rahim: दोन साध्वींवर बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना 40 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया जिल्हा तुरुंगात आहे. पॅरोल कालावधीत तो हरियाणातील सिरसा येथील डेरा सच्चा सौदात राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरमीत राम रहीमची पॅरोल काल संध्याकाळी मंजूर करण्यात आली. त्यानंतर, तुरुंग प्रशासनाने त्यांच्या सुटकेसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. पॅरोल दरम्यान, राम रहीम यांना अटींचे पालन करावे लागेल आणि सिरसा डेरा परिसराबाहेरील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. प्रशासनाकडून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.
अनेकवेळा पॅरोल आणि फर्लोवर तुरुंगातून बाहेर प
गुरमीत राम रहीम 2017 पासून रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहेत. दोन साध्वींवर बलात्कार केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणीही दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणांपासून, राम रहीम अनेकवेळा पॅरोल आणि फर्लोवर तुरुंगातून बाहेर पडला आहे, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. यावेळी 40 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी राम रहीमला निवडणुकीच्या काळात पॅरोल मंजूर करण्यात आला होता. तथापि, प्रशासनाने सांगितले की नियम आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. पॅरोल कालावधी पूर्ण झाल्यानंतर, गुरमीत राम रहीमला पुन्हा सुनारिया तुरुंगात शरण जावे लागेल.
शिक्षेतील जवळपास सव्वा वर्ष पॅरोलवर
25 ऑगस्ट 2017 रोजी, राम रहीमला त्याच्याच आश्रमातील दोन साध्वींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात पहिल्यांदाच दोषी ठरवण्यात आले आणि त्याच दिवशी तो पहिल्यांदा तुरुंगात गेला. त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. दोन वर्षांनंतर, 11 जानेवारी 2019 रोजी, तो पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी दोषी आढळला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 25 ऑगस्ट 2017 ते 4 जानेवारी 2025 पर्यंतच्या त्याच्या शिक्षेचा हिशोब केला तर त्याने अंदाजे 8 वर्षे शिक्षा भोगली आहे. पण उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, पॅरोल आणि फर्लोमुळे त्याने या 8 वर्षांपैकी एक वर्षापेक्षा जास्त काळ बाहेरगावी आनंद लुटण्यात घालवला आहे. तर यावेळी मिळालेल्या 40 दिवसांच्या पॅरोलची भर घातली तर तो तुरुंगाबाहेर आल्यापासून 400 हून अधिक दिवस होतील. तुरुंगात गेल्यानंतर सुमारे 5 वर्षे त्यालाही इतर कैद्यांप्रमाणे अधूनमधून पॅरोल मिळत राहिला, परंतु 2022 मध्ये जेव्हा हरियाणा सरकारने 'हरियाणा गुड कंडक्ट टेम्पररी प्रिझनर्स अॅक्ट'मध्ये सुधारणा केली तेव्हा फक्त राम रहीमनला जॅकपॉट लागला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या