Aditya Sharma Dies in Oman Attack: अमेरिका आणि इराण (Iran War Live Update) या दोन्ही देशांमधील संघर्ष पुन्हा पेटला आहे. मंगळवारी (9 जून) इराणने अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडल्यानंतर संतापलेल्या अमेरिकेने इराणवर जोरदार हल्ले सुरू केले आहे. अशातच दुसरीकडे ओमानच्या किनाऱ्याजवळून जाणाऱ्या एका मालवाहू जहाजावर अमेरिकेने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 9 जून रोजी ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकन सैन्याने 'एमटी सेटेबेलो'वर केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन भारतीय खलाशांपैकी 23 वर्षीय आदित्य (Aditya Sharma) हा एक होता. या जहाजावरील 24 भारतीय खलाशांपैकी 21 जणांची सुटका करण्यात आली, तर सुरुवातीला बेपत्ता असलेल्या तिघांना नंतर मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर भारत आणि अमेरिका यांच्या राजनैतिक संबंधात तीव्र पडसाद उमटले आहेत. तरदुसरीकडे 23 वर्षीय आदित्य शर्माच्या (Aditya Sharma) मृत्यूनंतर आदित्यचे (Iran War Aditya Sharma Death) वडील राजेश शर्मा यांच्याकाहीसोशलमीडियातीलपोस्टसध्याचर्चेतआल्याआहे. तरत्यांनीयाएकंदरीत अपघाताबाबतसविस्तरमाहितीदेखीलदिलीआहे.
Rajesh Sharma: आम्ही जवळपास दररोज बोलायचो. रविवारी व्हॉट्सॲप कॉलवर त्याने सांगितले की....
आपल्या वडिलांशी रविवारी झालेल्या शेवटच्या फोन संभाषणात, भारतीय खलाशी आदित्य शर्मा याने अमेरिकन सैन्याकडून मिळालेल्या "इशार्यांबद्दल" आणि 'एमटी सेटेबेलो' (MT Settebello) या पलाऊचा ध्वज असलेल्या व्यापारी टँकरवरील तणावपूर्ण परिस्थितीबद्दल माहिती दिली होती. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) जवळ सुरू असलेल्या नौदल नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर हे जहाज ओमानच्या किनारपट्टीजवळील पाण्यातून प्रवास करत होते. "आम्ही जवळपास दररोज बोलायचो. रविवारी व्हॉट्सॲप कॉलवर त्याने मला सांगितले की, गेल्या पंधरवड्यात त्यांना अमेरिकन नौदलाकडून किमान दोनदा इशारे मिळाले होते आणि तरीही जहाज 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'च्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. आम्हाला काळजी वाटत होती. त्याच दिवशी त्यांच्या आसपासच्या भागात असलेल्या दुसऱ्या एका जहाजावरही हल्ला झाला होता, पण त्याने आम्हाला खात्री दिली होती की त्या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे," असे आदित्यचे वडील राजेश शर्मा यांनी सांगितले.
Rajesh Sharma: मुलगा बेपत्ता झाल्याची बातमी समजल्यानंतर कुटुंब अत्यंत अस्वस्थ
आदित्यव्यतिरिक्त, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या इतर दोघांमध्ये मुख्य अभियंता (चीफ इंजिनिअर) सुरेश पटनाला आणि फिटर शिवानंद चौरसिया यांचा समावेश आहे. आदित्यचे कुटुंब हिमाचल प्रदेशातील हमीरपूरचे रहिवासी आहे आणि तो गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून एका व्यापारी जहाजावर 'डेक कॅडेट' म्हणून काम करत होता. आपला मुलगा बेपत्ता झाल्याची बातमी समजल्यानंतर कुटुंब अत्यंत अस्वस्थ होऊन बातम्यांवर लक्ष ठेवून होते. असे त्याच्या वडिलांनी सांगितले. पंजाबमधील जालंधरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, आदित्यने चेन्नईतील एका खाजगी विद्यापीठात 'नॉटिकल सायन्स'चे (सागरी विज्ञान) शिक्षण घेतले. जहाजावरील आपल्या पहिल्या मोहिमेवर जाण्यापूर्वी त्याने स्कॉटलंडमधील ग्लासगो येथून नॉटिकल सायन्समध्ये 'ॲडव्हान्स्ड डिप्लोमा' देखील पूर्ण केला होता.
Aditya Sharma Dies in Oman Attack: मे महिन्यात ओमानमध्ये काम थांबवून परतण्याची त्याची योजना होती, पण...
"जेव्हा तो नोव्हेंबरमध्ये (2025) कामावर रुजू झाला, तेव्हा कोणतेही युद्ध सुरू नव्हते. त्याने आम्हाला सांगितले होते की, जहाज यापूर्वी चीन-सिंगापूर मार्गावर होते आणि आता ओमानच्या दिशेने जात आहे. मे महिन्यात ओमानमध्ये काम थांबवून परतण्याची त्याची योजना होती, परंतु नंतर त्याने आणखी दोन महिने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला," असे त्याच्या वडिलांनी सांगितले. गुरुवारी सकाळी 'पलाऊ'चा ध्वज असलेल्या त्या जहाजाचे संचालन करणाऱ्या कंपनीने माहिती दिल्यानंतर कुटुंबाला त्याच्या मृत्यूची बातमी समजली. "आम्हाला सांगण्यात आले आहे की संबंधित दूतावासाने (भारतीय) सरकारला कळवले आहे. त्याचा मृतदेह सापडला आहे की नाही, हे आम्हाला माहीत नाही. आम्ही अधिक माहितीची वाट पाहत आहोत," असे राजेश म्हणाले. एकंदरीतकधीकाळी युद्धाचं समर्थन करणाऱ्या बापाची आपल्याच लेकाला शेवटचं बघण्यासाठी याचना करावीलागतआहे. ओमानच्या जहाजावरील हल्ल्यानंतर आदित्य शर्माच्या वडिलांच्याकाही पोस्ट सध्या चर्चेत आल्याआहे.
सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि मृतदेह परत आणण्यास मदत करावी, अशी या कुटुंबाची इच्छा आहे. "त्याच्या शेवटच्या क्षणी नक्की काय घडले, हे मला जाणून घ्यायचे आहे. परिस्थिती काय होती, त्याला वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले गेले. त्याला काही मदत मिळाली का? जगण्यासाठी त्याने किती संघर्ष केला असेल! जहाजावरील लोकांना सर्वात आधी वाचवण्यात आले होते," असे शर्मा म्हणाले. "मृत्यू झालेले इतर दोन खलाशीही माझ्या मुलांसारखेच होते. वारंवार इशारे दिले जात असतानाही इतक्या लोकांचे जीव धोक्यात का घातले गेले, हेच मला समजत नाहीये. आमच्या या हानीची जबाबदारी कोण घेणार?" असा सवाल त्यांनी केलाय.
