मुंबई: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना काम देण्यासंदर्भात सुरु असलेल्या वादात आता सर्वाच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजूंनीही उडी घेतली आहे. काटजूंनी बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आव्हान देणारे ट्वीट केले आहेत.


प्रसिद्ध चित्रपट निर्माते करण जोहर यांच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात पाकिस्तानी कलाकार फवाद आलम काम करत असल्याने, याच्या प्रदर्शनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यावरुन काटजूंनी मनसेला ललकारले आहे.


काटजूंनी आपल्या ट्वीटमध्ये, ''मनसे हा पक्ष दुर्बलांवरच हल्ले का करतो? जर तुमच्यात हिंमत असेल, तर माझ्याकडे या. माझा दंडूका तुमची वाट पाहात आहे. तुमचा समाचार घेण्यासाठी तो उत्सुक आहे.



काटजूंनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ''मनसेचे कार्यकर्ते गुंड आहेत. त्यांनी आरबी समुद्रातलं खारं पाणीच चाखलं आहे. मी इलाहबादचा गुंड आहे, जो संगमाचं पाणी प्यायला आहे.''


दरम्यान, काटजूंनी शिवसेनेलाही लक्ष्य केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांच्यावरही टीका केली आहे.