Accident News : भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र माहानार्यमन शिंदे (Mahanaryaman Scindia) यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी (Shivpuri in Madhya Pradesh) दौऱ्यादरम्यान त्यांचा अपघात झाला आहे. कोलारस विधानसभा मतदारसंघातील समर्थकांना अभिवादन करत असताना कारच्या ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्याने सनरुफवर आदळून माहानार्यमन यांना दुखापत झाली आहे. 

डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र माहानार्यमन शिंदे यांचे पुत्र कोलारस विधानसभा मतदारसंघातील समर्थकांना अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी कार ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्याने सनरूफवर आदळून माहानार्यमन यांना दुखापत झाली.  या घटनेनंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तपासणीनंतर, महान आर्यमन रुग्णालयातून बाहेर पडले आणि त्यांनी उपस्थित समर्थकांचे स्वागत केले, ज्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे दिसून आले. त्यानंतर ते लगेचच त्यांच्या कारने तिथून निघून गेले.

नेमकी कशी घडली घटना? 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपुरीच्या कोलारस परिसरात रोड शो दरम्यान, गाडीला अचानक ब्रेक लावावा लागला. या दरम्यान, माहानार्यमन सिंधिया यांचा तोल गेला आणि त्यांच्या छातीला दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात सुरक्षितपणे हलवले. दुखापत गंभीर नसली तरी, वैद्यकीय देखरेखीखाली सर्व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या. 

अपघातापूर्वी, माहानार्यमन सिंधिया शिवपुरी येथील श्रीमंत माधवराव सिंधिया क्रीडा संकुलात पोहोचले होते

अपघातापूर्वी, माहानार्यमन सिंधिया शिवपुरी येथील श्रीमंत माधवराव सिंधिया क्रीडा संकुलात पोहोचले होते. तिथे त्यांनी 69 व्या राष्ट्रीय महिला अंडर-19 क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली होती. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधला, त्यांच्या सुविधा आणि गरजांबद्दल विचारपूस केली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी केवळ सामना पाहिला नाही तर स्वतः फलंदाजी करून त्यांचे मनोबलही वाढवले होते. त्यानंतर ते कोलारस विधानसभा मतदारसंघातील समर्थकांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणीच परिशरात  रोड शो दरम्यान, गाडीला अचानक ब्रेक लावावा लागला. या दरम्यान, माहानार्यमन सिंधिया यांचा तोल गेला आणि त्यांच्या छातीला दुखापत झाली. त्यानंतर माहानार्यमन शिंदे यांना रुग्णालयात नेण्याते आले होते.