- गॅस सिलेंडर सबसिडी
- रेशन
- स्कॉलरशिप
- मध्यान्ह भोजन
- पासपोर्ट
- मोबाईल
- वाहन खरेदी
- बँक
सरकारी योजनांसाठी आधार कार्डची सक्ती नको : सुप्रीम कोर्ट
एबीपी माझा वेब टीम | 27 Mar 2017 12:54 PM (IST)
नवी दिल्ली: सरकार सगळीकडे आधार कार्ड सक्तीचं करत असताना, सुप्रीम कोर्टाने मात्र त्याला आक्षेप घेतला आहे. कल्याणकारी योजनेचा लाभार्थ्यांना आधार कार्ड सक्ती करु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. मात्र सरकारला बँक खाती उघडण्यासारख्या योजनांसाठी आधार कार्डच्या सक्तीसाठी रोखू शकत नाही, असंही सुप्रीम कोर्टाने नमूद केलं. आधार कार्ड सक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीसाठी सात न्यायाधीशांचं खंडपीठ गठीत करण्यात येणार आहे. समाज कल्याण योजनांसाठी आधार सक्ती नको असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. इन्कम टॅक्स रिटर्नसारख्या दुसऱ्या बाबींसाठी कोणतेही निर्बंध नाहीत. केंद्र सरकारने अनेक समाज कल्याण योजणांसाठी आधार कार्ड सक्तीचं केलं आहे. आधार कार्ड कुठे-कुठे सक्तीचं आहे?