Argentina Earthquake : दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिना येथे 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. त्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे सहा वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू अर्जेंटिनामधील दक्षिणेकडील उशुआया राज्यापासून 222 किमी अंतरावर असलेल्या समुद्रातील ड्रेक पॅसेजमध्ये होते, ज्याची खोली 10 किमी होती. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, 15 मिनिटांत त्याच ठिकाणी 5.4, 5.7 आणि 5.6 रिश्टर स्केलचे 3 आफ्टरशॉक देखील आले. ड्रेक पॅसेज हा दक्षिण अमेरिकेतील केप हॉर्न, चिली, अर्जेंटिना आणि अंटार्क्टिकाच्या दक्षिण शेटलँड बेटांदरम्यानचा समुद्री क्षेत्र आहे.

आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

प्रशासनाने लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. प्रभावित भागात त्सुनामीचा इशारा देणारे सायरन वाजू लागले आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एक दिवस आधीही अर्जेंटिनामध्ये 5.8  रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. चिलीच्या दक्षिणेकडील किनारपट्टी रिकामी करण्यात येत आहे. अर्जेंटिनाचा शेजारी देश असलेल्या चिलीच्या किनारी भागातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लाटा चिलीमधील प्वेर्टो विल्यम्सपर्यंत पोहोचू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. चिलीच्या राष्ट्रीय आपत्ती सेवेने संपूर्ण दक्षिणेकडील किनारपट्टी रिकामी करण्यास सांगितले आहे. यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक म्हणाले की, भूकंपाचा सामना करण्यासाठी देशाकडे सर्व संसाधने आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही लोकांना मॅगेलन परिसरातील समुद्रकिनाऱ्यापासून दूर जाण्याचे आवाहन करतो. यावेळी आपल्याला अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करावे लागेल.

टेक्टोनिक प्लेट्स धडकल्याने भूकंप होतात

दरम्यान, पृथ्वी मोठ्या टेक्टोनिक प्लेट्सवर स्थित आहे. त्याखाली द्रवरूप लावा आहे. या प्लेट्स सतत तरंगत राहतात आणि कधीकधी एकमेकांशी आदळतात. टक्करीमुळे प्लेट्सचे कोपरे कधीकधी वाकतात आणि जेव्हा जास्त दाब असतो तेव्हा या प्लेट्स तुटू लागतात. अशा परिस्थितीत, खालून बाहेर येणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि या गोंधळानंतर भूकंप होतो. जेव्हा टेक्टोनिक प्लेट्स पृथ्वीच्या आत अनेक मैल सरकतात तेव्हा शेकडो अणुबॉम्बइतकी ऊर्जा बाहेर पडते.

इतर महत्वाच्या बातम्या