Bank Employee Shot Dead : उत्तर प्रदेशातील नोएडा (Bank Employee was Shot Dead) एका 29 वर्षीय बँक डेटा मॅनेजरची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बँकरच्या कुटुंबाने आरोप केला आहे की त्याची पत्नी आणि सासरचे लोक या हत्येसाठी जबाबदार आहेत. गाझियाबादस्थित बँक डेटा मॅनेजर मनजीत मिश्रा यांच्यावर शुक्रवारी ग्रेटर नोएडा येथे कामावर जात असताना हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी साडे आठ वाजता दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली, त्यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि ते पळून गेले. ही संपूर्ण घटना कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सासरचे लोक "खालच्या जातीतील" असल्याने नाराज!

मिश्राच्या कुटुंबाने पत्नी मेघा राठोड आणि तिच्या नातेवाईकांवर आंतरजातीय विवाहावरून निर्माण झालेल्या तणावाचे कारण देत ही हत्या घडवून आणल्याचा आरोप केला आहे. ब्राह्मण असलेल्या मिश्राने वर्षभरापूर्वी त्याच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध मेघा या ठाकूरशी लग्न केले होते. त्याची बहीण रूपम हिने दावा केला आहे की त्याचे सासरचे लोक त्याला "खालच्या जातीतील" असल्याने नाराज करत होते आणि वारंवार धमक्या देत होते. हल्ल्यांनंतर, मिश्राचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आलेल्या स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मनजीतच्या हत्येसाठी बायकोने आणि मेव्हण्याने सुपारी दिल्याचा आरोप होत आहे. 

पाठलाग आणि धमकी देण्याच्या घटना

त्यांच्या कुटुंबाने सांगितले की त्यांनी यापूर्वी गाझियाबाद पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, ज्यात त्यांच्या सासरच्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप केला होता. रूपमने पुढे आरोप केला की मेघाच्या कुटुंबाने त्यांना अनेक वेळा त्रास दिला होता, ज्यामध्ये पाठलाग आणि धमकी देण्याच्या घटनांचा समावेश होता. पोलिसांनी मिश्राची पत्नी आणि मेहुण्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मेहुण्याला अटक करण्यात आली असून बायकोवर अजून कारवाई करण्यात आलेली नाही. प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि अधिक माहितीसाठी अधिकारी डॅशबोर्ड कॅमेऱ्याचे फुटेज तपासत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या