7 व्या वेतन आयोगावर उद्या निर्णय, 15 टक्के वेतनवाढीची शिफारस
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2016 03:28 PM (IST)
नवी दिल्लीः केंद्रीय कॅबिनेटच्या उद्या होणाऱ्या बैठकीत 7 व्या वेतन आयोगावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आयोगाने जवळपास मूळ वेतनात जवळपास 15 टक्के वेतनवाढ करण्याची शिफारस केली आहे. आयोगाच्या शिफारशींमध्ये प्रस्तावित भत्त्यांचा समावेश केल्यास तब्बल 23.55 टक्के वेतनवाढ होणार आहे. वेतन आयोग लागू झाल्यानंतर एक कोटी नोकरदार आणि पेंशनधारकांना लाभ होणार आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये वेतन आयोगाने केंद्राला शिफारसी सादर केल्या होत्या. यामध्ये मूळ वेतनात 14.27 टक्के वेतनवाढ करण्याची तरतूद आहे. ही तरतूद गेल्या 70 वर्षातील सर्वात कमी तरतूद असल्याचं बोललं जात आहे.