मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असला तरी गेल्या काही दिवसांपासून दररोज वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात मागील 24 तासात नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या दुप्पट आहे. राज्यात काल 7 हजार 089 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर 15 हजार 656 जण कोरोनातून मुक्त झाले. तसंच महाराष्ट्रातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता 83.49% झालं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
दुसरीकडे देशातही दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील पाच आठवड्यात देशात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख घसरला आहे. 9 ऑक्टोबर रोजी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 9 लाखांच्या खाली पोहोचली आणि त्यानंतर हा आलेख उतरताच आहे.
63 दिवसांनंतर देशात प्रथमच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे. सोमवारी देशात कोरोनाच्या 55,342 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 706 जणांचा मृत्यू झाला. 10 ऑगस्टनंतर देशात पहिल्यांदाच नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या खाली आली आहे. 10 ऑगस्टला देशात कोरोनाचे 51,296 रुग्ण सापडले होते. यानंतर हा आकडा सातत्याने वाढत गेला होता.
भारतात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 71 लाख 75 हजार 881 वर पोहोचली आहे. तर च्या पार गेली आहे. यापैकी एक लाख 9 हजार 856 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 62 लाख 27 हजार 296 जण कोरोनामुक्त झाले आहेत. अॅक्टिव रुग्णांची संख्या कमी होऊ 8 लाख 60 हजारांवर आली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या सहापट जास्त आहे.
कोरोनाबाधित देशांची यादी
अमेरिका : कोरोनाबाधित- 8,037,789, मृत्यू- 220,011
भारत : कोरोनाबाधित- 7,173,565, मृत्यू- 109,184
ब्राझिल : कोरोनाबाधित- 5,103,408, मृत्यू- 150,709
रशिया : कोरोनाबाधित- 1,312,310, मृत्यू- 27,985
कोलंबिया : कोरोनाबाधित- 919,083, मृत्यू- 27,834
स्पेन : कोरोनाबाधित- 918,223, मृत्यू- 33,124
अर्जेंटिना : कोरोनाबाधित- 903,730, मृत्यू- 24,186
पेरु : कोरोनाबाधित--851,171 , मृत्यू- 33,357
मैक्सिको : कोरोनाबाधित- 821,045, मृत्यू- 83,945
फ्रान्स : कोरोनाबाधित- 743,479, मृत्यू- 32,779