अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. या योजनेचा लोगोही तयार करण्यात आला आहे. 30 वेळा प्रयत्न करुनही लोगो बनवण्यात अपयश आलं. 31 वा प्रयत्न यशस्वी झाला, अशी माहिती लोगो तयार करणाऱ्या चक्रधर आलाने दिली.
चक्रधर आला हा नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबादचा विद्यार्थी आहे. मोदी सरकारकडून mygov.in वर डिझाईनवर जेवढ्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये सहभाग घेतला. सतत अपयश आलं, मात्र अखेर बुलेट ट्रेनचा लोगो निवडला गेला, अशी माहिती चक्रधर आलाने दिली.
आपण तयार केलेला लोगो प्रत्येक ठिकाणी पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं चक्रधर आलाने सांगितलं. हा लोगो जवळून पाहिल्यास यामध्ये बुलेट ट्रेनची आकृती दिसते, असंही तो म्हणाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 सप्टेंबर रोजी बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन केलं होतं. या प्रकल्पाला जपानचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. या प्रकल्पासाठी जपान एक लाख कोटी रुपये 0.1 टक्के व्याजदराने देणार आहे.
तब्बल 31 वेळा प्रयत्न, 27 वर्षीय मुलाकडून बुलेट ट्रेनचा लोगो तयार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Oct 2017 12:57 PM (IST)
30 वेळा प्रयत्न करुनही लोगो बनवण्यात अपयश आलं. 31 वा प्रयत्न यशस्वी झाला, अशी माहिती लोगो तयार करणाऱ्या चक्रधर आलाने दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -