नवी दिल्ली: दिवाळीपूर्वी मोदी सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना एक खास भेट दिली आहे. मोदी सरकारनं महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेन्शनधारक आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 टक्के महागाई भत्ता वाढवून देण्यास मंजूरी दिली आहे.


सरकारच्या या निर्णयानं जवळजवळ 50.68 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 54.24 लाख पेन्शनधारकांना फायदा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बेसिक वेतनाच्या 2 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक जुलै 2016 पासूनचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

दोन टक्के महागाई भत्ता दिल्यानं सरकारवर 5,622.10 कोटीचा अतिरिक्त बोझा येणार आहे. याआधी केंद्र सरकारनं या वर्षी मार्च महिन्यात महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ केली होती.