4 लाख महिलांवर नरसंहार, सामूहिक अत्याचार; भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा नापाक चेहरा पुन्हा उघड केला
India vs Pakistan: महिला हक्कांबाबतच्या निराशाजनक कामगिरीबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर सडकून टीका (India blasted Pakistan at the United Nations) केलीय.

India vs Pakistan: महिला हक्कांबाबतच्या निराशाजनक कामगिरीबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर सडकून टीका (India blasted Pakistan at the United Nations) केलीय. सोबतच 1971 मध्ये ऑपरेशन सर्चलाइट (Operation Searchlight) दरम्यान 4 लाख महिलांवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेबद्दल पाकिस्तानची निंदा (India blasted Pakistan) केलीय. इस्लामाबादने संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) व्यासपीठावर काश्मिरी महिलांचे दुःख अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला आणि सुरक्षेवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या चर्चेदरम्यान एका ज्वलंत भाषणात, भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानला भ्रामक आणि भडकाऊ वक्तव्य विशेषतः ते हि जम्मू आणि काश्मीरबद्दल सुरू ठेवलेल्याने फटकारलेय.
"महिला, शांतता आणि सुरक्षा या विषयावरील आमचा अग्रगण्य रेकॉर्ड निष्कलंक आणि अबाधित आहे. जो देश स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करतो, पद्धतशीर नरसंहार करतो, तो केवळ चुकीच्या दिशानिर्देशाने आणि अतिरेकी प्रचाराने जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतो," असे हरीश म्हणाले. "गेल्या महिन्यात खैबर पख्तूनख्वा प्रांतात रात्रीच्या वेळी झालेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाने मुलांसह 30हून अधिक लोकांचा बळी घेतल्याच्या संदर्भात स्वतःच्याच लोकांवर बॉम्बस्फोट केल्याचं बोललं गेलं.
Operation Searchlight : ऑपरेशन सर्चलाइट
महत्त्वाचे म्हणजे, संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय प्रतिनिधीने 1971च्या ऑपरेशन सर्चलाइटचा उल्लेख केला, ज्या दरम्यान पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये बंगाली लोकांविरुद्ध क्रूर कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान, लाखो महिलांना ताब्यात घेण्यात आले आणि वारंवार त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या कारवाईचा सूत्रधार पाकिस्तानचे कुख्यात लष्करी कमांडर जनरल टिक्का खान यांनी केलं होतं, ज्याला 'बंगालचा कसाई' असे नाव देण्यात आले होते. 1971च्या मुक्ती युद्धादरम्यान हे क्रूर कृत्य घडले, ज्यामुळे अखेर बांगलादेशची निर्मिती झाली. कारण पाकिस्तानने पराभव स्वीकारला आणि ढाका येथे बिनशर्त शरणागती पत्करली.
Sanctioned Mass Rape of 4,00,000 : 4 लाख महिलांवर नरसंहार, सामूहिक अत्याचार
दरम्यान, यावेळी अशा ऐतिहासिक उल्लंघनांवर प्रकाश टाकत, हरीश यांनी असे सांगितले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानच्या प्रचारातून पाहिले."1971 मध्ये ऑपरेशन सर्चलाइट चालवणारा हा देश आहे आणि त्याच्याच सैन्याने 4,00,00 महिला नागरिकांवर सामूहिक बलात्कार करण्याची पद्धतशीर मोहीम राबवली होती," असेही ते म्हणाले.
पाकिस्तानच्या प्रतिनिधी सायमा सलीम यांनी त्यांच्या भाषणात काश्मीरमधील महिलांनी दशकांपासून "युद्धाचे शस्त्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या लैंगिक हिंसाचाराला सहन केले आहे" असा आरोप केल्यावर भारताची ठाम प्रतिक्रिया आली. तथापि, नेहमीप्रमाणे, पाकिस्तानच्या दाव्यांना कोणत्याही पुराव्याने पाठिंबा मिळाला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या


















