Buldhana News : बुलढाणा जिल्हा पोलीस दलात (Buldhana Police) आयकर विभागाच्या (Income Tax Department) नोटिसांमुळे खळबळ उडाली आहे. यात तब्बल 1050 पोलीस अंमलदारांना गेल्या तीन ते चार वर्षात आयकर रिटर्न्समध्ये बोगस कपाती दाखवून कर चोरी करण्याच्या संशयावरून नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत आयकर विभागाने पोलीस अधीक्षक कार्यालयालाच नोटीस बजावली आहे. त्यामुळे बुलढाणा पोलीस दलासह राज्याच्या पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

Buldhana Police : आयकर विभागाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला नोटीस; पोलीस अधीक्षक निलेश तांबे ॲक्शन मोडवर

दरम्यान, हा प्रकार चार्टर्ड अकाउंटंटच्या संगणमताने गेल्या तीन ते चार वर्षात पोलीस कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर केल्याचे समोर आले आहे. आयकर विभागाच्या पडताळणीत ही बाब समोर आली आहे. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी कलम 80c आणि ग्रह कर्जावरील व्याज सवलतीच्या अंतर्गत बनावट गुंतवणुकी दाखवत कर कपात मिळवली. प्रत्यक्षात विमा, पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा गृह कर्ज नसतानाही मोठ्या रकमेच्या कपाती दाखवल्या गेल्या आहेत आणि हे सर्व रिटर्न एकाच चार्टर्ड अकाउंटंटच्या माध्यमातून दाखल करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यातला. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कठोर भूमिका घेत सहा नोव्हेंबर रोजी सर्व पोलीस अंमलदारांना आपले इन्कम टॅक्स रिटर्न्स तपासून जर चूक आढळल्यास तात्काळ सुधारित विवरणपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

Continues below advertisement

आयकर चोरीच्या संशयावरून इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस आल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांना विचारणा केली असता अभ्यास करून मी प्रतिक्रिया देईल असं त्यांनी सांगितलं.

पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांतील आरोपी मोकाट फिरत आहेत. 'गुन्हेगारांनी पुणे पोलिसांना नाकी नऊ आणले आहेत,' ही परिस्थिती सध्याच्या घटनांवरून स्पष्ट होते. मुंढवा जमीन घोटाळ्यातील (Mundhwa land case) प्रमुख आरोपी शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) पतीसह परदेशात पसार झाल्याचा संशय आहे. त्याचबरोबर, कुख्यात गुंड नीलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) हा देखील पोलिसांना गुंगारा देऊन परदेशात पळून गेला आहे आणि त्याच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagawane suicide case) आरोपी पती आणि सासऱ्यांना अटक करण्यास सात दिवसांचा विलंब झाला. तर, वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात (Pooja Khedkar case), तिच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल होऊनही ते फरार आहेत, ज्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्न निर्माण झाले आहेत.

ही बातमी वाचा: