Horoscope Today 9 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 9 ऑगस्ट 2025, आजचा वार शनिवार आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आज रक्षाबंधन हा सण आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कोणत्याही कामचलाऊ गोष्टी करण्यापेक्षा योग्य गोष्टी करण्याकडे कल ठेवा
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज स्वतःसाठी काम करण्याऐवजी आज दुसऱ्यासाठी काम करावे लागेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कोणतीही गोष्ट मर्यादेबाहेर गेली, तर बंड करून उठणार आहात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी किंवा देशांतर्गत प्रवासाची शक्यता
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज व्यवसायात हाताखालच्या कामगारांचे सहकार्य मिळेल, भाग्याची बाजू फारशी आढळत नसली तरी प्रयत्नांवर विश्वास ठेवून यश खेचून आणाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज परिस्थितीशी झगडण्यात मोठी शक्ती खर्च करावी लागेल, नवीन जबाबदारी अंगावर पडतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज राजकारणात मुरलेल्या लोकांना जनतेचा प्रतिसाद चांगला मिळेल, कामाचे उत्तम नियोजन आणि सूत्रबद्धता तुमचा दर्जा वाढेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज व्यवहाराच्या पातळीवर तुमचा हात कोणी धरणार नाही, कोण किती पाण्यात आहे तुम्हाला लगेच समजेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तुमची तयारी राहील, घरामध्ये ज्याच्या जशा गरजा असतील त्याप्रमाणे त्या पुरवण्याचा आटापिटा कराल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज घरचे लोक खुश राहतील, तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे घरात सुख शांती लाभेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो घरामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन कराल, प्रकृतीमान चांगले राहील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यायामाची साथ घ्या, जोडीदाराशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज धडाडी वाढली तरी रागाला काबुत ठेवावे लागेल. एखादा निर्णय तडका फडकी घेण्यापासून सावधान.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)