Horoscope Today 21 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Today Horoscope)


नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, आज आठवड्याचा पहिला दिवस असल्या कारणाने ऑफिसच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल.  


व्यवसाय (Business) - व्यवसायिकांबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्हाला कामाच्या नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुम्ही खुश असाल. 


विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरु असल्या कारणाने त्यांच्यावर अभ्यासाचा थोडाफार ताण जाणवेल. थोडा आराम करावा लागेल.   


आरोग्य (Health) - आज तुम्हाला सांधेदुखीचा त्रास जाणवेल. यासाठी तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. 


वृषभ रास (Taurus Today Horoscope)


नोकरी (Job) - निवडणूक असल्या कारणाने कामाचा ताण वाढलेला दिसेल. जोपर्यंत तुमचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला मानसिक शांतता मिळणार नाही. 


व्यवसाय (Business) - आज जे रेस्टॉरंट, हॉटेल आणि व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत त्यांना चांगला फायदा मिळेल. 


विद्यार्थी (Student) - तुमची इच्छा नसतानाही आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटचा भाग बनू शकणार नाहीत.


आरोग्य (Health) - हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. 


मिथुन रास (Gemini Today Horoscope)


नोकरी (Job) - बँकिंग क्षेत्राशी संबंधित नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला असेल. नोकरदारांना नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.


व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायात नवीन ग्राहक जोडण्यासाठी तुम्ही डिजिटल जाहिरातींची मदत घ्याल. कामात तुमची कार्यक्षमता तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल.


विद्यार्थी (Student) - स्पर्धात्मक परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी सजग राहून तयारीला सुरुवात करावी आणि शिक्षकांच्या सल्ल्याचं पालन करावं. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन तुम्ही बनवू शकता.


आरोग्य (Health) - आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.


कर्क रास (Cancer Today Horoscope) 


नोकरी (Job) -  नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस अधिक कामकाजाचा, तणावाचा असणार आहे. डोकं शांत ठेवून सगळी कामं करा. 


आरोग्य (Health) - आज तुमचे आरोग्य चांगले असणार आहे. मात्र, कामाच्या वाढत्या व्यापामुळे तणाव जाणवू शकतो. 


तरूण (Youth) - ज्या तरूणांना सरकारी नोकरीची इच्छा आहे त्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. 


कुटुंब (Family) - कुटुंबात सुख-शांती नांदावी यासाठी गरजूंना दान करा. 


सिंह रास (Leo Today Horoscope) 


नोकरी (Job) - ग्रहांच्या स्थितीनुसार, ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. हीच वेळ आहे कामाच्या ठिकाणी तुमची छाप पाडण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची. त्या दृष्टीने प्रयत्न करा. 


आरोग्य (Health) -आज तुमच्या शरीरात कॅलरीचे प्रमाण फार वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला सतत अस्वस्थ वाटेल. 


व्यापार (Business) - जे शेअर मार्केटमध्ये काम करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. काळजीपूर्वक पैशांची गुंतवणूक करा. 


तरूण (Youth) - आज तुमचा आत्मविश्वास काही ठिकाणी कमी पडू शकतो. अशा वेळी चिडचिड करू नका. शांत होऊन हनुमान चालिसेचा जप करा. 


कन्या रास (Virgo Today Horoscope) 


नोकरी (Job) - आज तुम्ही कामात जरा सावधानतेनेच काम करा. कोणाशीही कोणत्याही प्रकारे गॉसिपिंग करू नका.


आरोग्य (Health) - तुमच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश जास्तीत जास्त करा. कारण बद्धकोष्ठतेच्या त्रासाने तुम्ही हैराण होऊ शकता. 


व्यापार (Business) - व्यवसायात चढ-उतार पाहायला मिळू शकतो. आजच्या दिवशी कामात कदाचित समाधानकारक कमाई होणार नाही. पण, खचून जाऊ नका. 


कुटुंब (Family) - कुटुंबात काही कारणास्तव तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवा. 


तूळ (Libra Today Horoscope) 


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांना आज काम करावसं वाटणार नाही, तरी काम करावं लागेल.


व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यापारी वर्ग आज नवीन नियोजनात व्यस्त असेल, येत्या काळात चांगला नफा होईल.


विद्यार्थी (Student) - परीक्षेसाठी जोमाने तयारी करा, चांगले गुण मिळतील.


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, अंगदुखी तुम्हाला हैराण करू शकते.


वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  


नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आयटीमध्ये काम करणाऱ्यांना आज कामाचा ताण खूप वाढेल. बाकीच्यांना ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात.


व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाच्या उत्पादनात वाढ होईल, चांगला खप होऊन आर्थिक लाभ मिळेल.


विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा दिवस हलका असेल. आज तुमच्यावर अभ्यासाचा जास्त ताण नसेल.


आरोग्य (Health) - आरोग्य ठणठणीत असेल, परंतु मानसिकदृष्ट्या तुम्हाला त्रास जाणवेल.


धनु (Sagittarius Today Horoscope)


नोकरी (Job) - नोकरदार लोकांना आज कामाचा ताण जाणवेल. सहकारी आणि वरिष्ठांची मदत तुम्हाला लाभेल.


व्यवसाय (Business) - रिअल इस्टेटमधील व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला असेल. तुम्ही जे कोणतं काम कराल त्यात चांगला नफा मिळू शकेल.


विद्यार्थी (Student) - तुम्ही आज कुठलंही काम हलक्यात घेऊ नका, अन्यथा ओरडा मिळू शकतो.


आरोग्य (Health) - आज तुम्ही तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा डोकेदुखी जाणवू शकते.


मकर (Capricorn Today Horoscope)


नोकरी (Job) - आजचा दिवस लाभाचा आहे. नोकरीत वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य लाभेल.


व्यवसाय (Business) - आज व्यवसायात तुम्हाला थोडं सांभाळून राहावं लागेल, एखादा ग्राहक गफलत करू शकतो. 


विद्यार्थी (Student) - आज कोणतंही काम मन लावून करा, अन्यथा मोठी चूक होऊ शकते.


आरोग्य (Health) - तुम्ही बाहेरचं खाणं टाळावं, अन्य़था तुमच्या जीवाशी बेतू शकतं. 


कुंभ (Aquarius Today Horoscope)              


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला आहे. आज डोकं लावून ऑफिसची कामं पूर्ण करा, सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील.


व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगले प्रोजेक्ट मिळतील. आज तुम्हाला चांगला नफा मिळेल, नवीन ग्राहक जोडले जातील.


विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज अभ्यासात लक्ष द्यावं, शिक्षकांचा सल्ला घ्यावा, प्रगती होईल.


आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य चांगलं असेल. कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही. 


मीन (Pisces Today Horoscope)


नोकरी (Job) - आज तुम्हाला जादाचं काम करावं लागेल, तुमचं टेन्शन वाढू शकतं.


व्यवसाय (Business) - जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवायला हवे, हा निर्णय तुमच्या व्यवसायासाठी चांगला ठरेल.


विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज अभ्यासाकडे थोडं जास्त लक्ष द्यावं, अन्यथा तुम्हाला शिक्षकांकडून ओरडा पडेल.


आरोग्य (Health) - शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तुमचं शरीर निरोगी होऊ शकतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


November 2024 Astrology : नोव्हेंबरमध्ये 5 राशींचे 'अच्छे दिन' होणार सुरू; ऐन दिवाळीत मोठ्या ग्रहांचं परिवर्तन, प्रत्येक कामात मिळणार यश