Horoscope Today 19 February 2026: आज शिवजयंतीचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने विघ्न होईल दूर, आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 18 February 2026: आज गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 19 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 19 फेब्रुवारी 2026, आजचा वार गुरूवार आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांशी वाद न घालता, काम साधून घेणे चांगले जमेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज अहंकार बाजूला ठेवून आचरण ठेवले तर, ते फायद्याचे ठरेल, रक्तदाब हृदयविकाराच्या पेशंटने पथ्य पाणी आहार विहार सांभाळावा
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज मनाचा तोल सांभाळावा, नातेवाईकांना हात उसने दिलेले पैसे मागण्यासाठी शुभ दिवस
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज पैशाची वसुली करताना उच्चपदस्थ लोकांची मध्यस्थी घ्यायला हरकत नाही. महिलांना आपले स्वत्व जपण्याची संधी मिळेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज तरुणांना स्वतःसाठी काही उत्पन्नाची बाब असावी, याचा साक्षात्कार होऊन कामाला लागतील
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते याचा प्रत्यय आजच्या दिवसात येईल, नावीन्याची आवड राहील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज मी म्हणेल ती पूर्व दिशा हे तुमच्या कृतीतून तुम्ही दाखवून द्याल, परंतु नोकरी धंद्यात वरिष्ठांच्या अनाकलनीय वागण्यामुळे गोंधळून जाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज योग्य नियोजन आणि कामाची तत्परता यामुळे लोकांची मर्जी सांभाळण्यात यश मिळेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज तरुणांना प्रिय व्यक्तींचा सहवास हवासा वाटेल, परंतु घरातील मोठ्या व्यक्तींच्या शिस्तीमुळे त्याला बंधन येईल आणि थोडी चिडचिड होईल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज काही गोष्टींसाठी प्रचंड कष्ट करावे लागतील, त्यानंतरच कामे पूर्ण होतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांनी मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे जरुरीचे ठरेल, कामाच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम हे सूत्र मात्र लक्षात ठेवा
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज भरपूर काम करताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे जरुरी आहे, नैसर्गिक समतोल आहार घेण्यावर भर द्या.
हेही वाचा,
Shani Ast 2026: साडेसातीपासून मोठा दिलासा! मार्चमध्ये शनिचा अस्त होतोय, 3 राशींच्या ओंजळीत मावणार नाही इतकं सुख शनिदेव देतील...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
























