OTT Movies : अनेक हॉलिवूड, दाक्षिणात्य चित्रपटांचे डबिंग हे हिंदी किंवा अन्य प्रादेशिक भाषेत झाले आहेत. मराठीत या चित्रपटांचे डबिंग न झाल्याने मायबोलीतील या धडाकेबाज चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना मिळत नाही. मात्र, आता अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटने 'अल्ट्रा झकास फ्रायडेस' वर चित्रपटांची पर्वणी आणली आहे. यामध्ये प्रेक्षकांना मराठीत डब केलेल्या हॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर्ससह अनेक भाषांमधील सुपरहिट चित्रपट पाहता येणार आहे.

यामुळे मराठी भाषिक प्रेक्षकांपर्यंत उच्च श्रेणीतील प्रादेशिक भाषा, आशियाई आणि हॉलीवूड चित्रपटांची मेजवानी मिळणार असल्याचे अल्ट्रा ओटीटीच्यावतीने सांगण्यात आले. दर शुक्रवारी, अल्ट्रा झकास फ्रायडेज जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करणारे काही मोजके सुपरहिट चित्रपट दाखवणार आहेत. हे चित्रपट ॲक्शन-पॅक थ्रिलर्स आणि रोमँटिक ड्रामापासून ॲनिमेटेड फीचर्स आणि हॉरर फ्लिक्स अशा विविध धाटणीच्या आहेत. 

कोणते चित्रपट पाहाल?

घिल्ली (धडाकेबाज घिल्ली )

साऊथचा मेगास्टार विजय थलापथी आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचा तमिळ चित्रपट घिल्लीने बॉक्स ऑफिसवर त्याच्या ॲक्शन, रोमान्स आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांना मोहिनी घातली. आता प्रेक्षकांना हा चित्रपट मराठीमध्ये पाहण्याचा आनंद घेता येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन धरणी यांनी केले असून ही कथा वेलू या महत्त्वाकांक्षी कबड्डीपटूची आहे जो प्रादेशिक कबड्डी खेळात भाग घेण्यासाठी मदुराईला आला. जिथे तो धनलक्ष्मीला तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करणाऱ्या माणसापासून वाचवतो.

बावरे प्रेम हे

“बावरे प्रेम हे” ह्या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, उर्मिला कोठारे आणि विद्याधर जोशी यांची अप्रतिम स्टारकास्ट असून या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी केले आहे. नील त्याच्या मित्रासोबत गोवा ट्रिपला जातो, जिथे त्याचा अनन्या नावाच्या मुलीशी वाद होतो. पुन्हा जेव्हा त्याची भेट अनन्याशी होते  तेव्हा तो माफी मागतो पण त्या बदल्यात ती नीलकडे तिचं हरवलेल पुस्तक शोदून देण्यात मदत मागते. मदत केल्यानंतर रोज भेटून ऐकत्र फिरत असताना नीलच्या मनात अनन्याबद्दल भावना निर्माण होतात. नीलच्या मनात प्रेमाची भावना आहे हे कल्यावर अनन्या त्याचा प्रेमाला  स्वीकारेल का ?

ए.एम.आय  (नवयुग)

जेव्हा तंत्रज्ञान मानवी मनावर ताबा मिळवतो आणि तुम्हाला काही भयानक गोष्टी करायला भाग पडतो, जेणेकरून तुमच्या आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो. हॉलीवूडचा ए.एम.आय म्हणजेच मराठी नाव नवयुग चित्रपटाचे दिग्दर्शक रस्टी निक्सन आहेत. ही कथा एक सतरा वर्षांची मुलगी कॅसी बद्दल आहे जिने आपली आई गमावले आहे आणि ती तिच्या फोनवर कृत्रिम तंत्रज्ञानाशी नाते निर्माण करते जी तिच्या मनाशी खेळते आणि तिला भयानक गोष्टी करायला लावते. कॅसी या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अंत करू शकेल का? किंवा या प्रक्रियेत ती स्वतःला इजा करेल?

गन्स ट्रान्स ॲक्शन

तेलुगू चित्रपट गन्स ट्रान्स ॲक्शन या चित्रपटात चैतन्य पासुपुलेती, हीना राय आणि सुदर्शन यांची भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक सिद्धांत यांनी केले असून तुम्हाला हा चित्रपट मराठीमध्ये पाहायला मिळेल.या चित्रपटातील पात्रांची रचना GTA या अतिशय प्रसिद्ध गेमच्या आधारे करण्यात आली आहे.

क्लिअरिंग (बापमाणूस )

डेव्हिड मॅटालॉन यांचा हॉलीवूड चित्रपट द क्लिअरिंग म्हणजेच बापमाणूस आता तुम्ही मराठीमध्ये पाहू सकता. या चित्रपटाची कथा वडील आणि त्याचा मुलीबद्दल आहे जे कॅम्पिंग ट्रिपला गेले असतात आणि तिथे त्याला झोम्बींचा सामना करून आपल्या बेपत्ता झालेल्या मुलीला शोधायच असतं.

हे चित्रपट कधी आणि कुठे पाहता येतील?

'अल्ट्रा झकास' ओटीटी प्लॅटफॉर्मवर 5 जुलैपासून पाहता येणार आहेत. 5 जुलै रोजी घिल्ली (धडकेबाज) स्ट्रीम होईल. त्यानंतर हे सगळे चित्रपट हे 12 जुलै, 19 आणि 26 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.