Hingoli : एकीकडे राज्य आणि केंद्र सरकार मोठमोठी महामार्ग करत आहेत, त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. समृद्धी महामार्ग असो वा शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्गसुद्धा करण्याचा घाट घातला जातोय. परंतू, आजही अनेक गावांमध्ये रस्त्यांच्या समस्या कायम आहेत. हिंगोली जिल्ह्यातील मळई या गावाला रस्ताच नसल्यामुळं नागरिकांना चिखलामधून पायपीट करावी लागत आहे. गावातील गरोदर असलेल्या सरसाबाई शेळके या महिलेच्या अचानक पोटात दुखत असल्याने रुग्णालयात नेण्यासाठी नागरिकांनी चक्क खाटावर टाकत या महिलेला रुग्णालयात दाखल केलं आहे.

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे आदिवासींचे प्रश्न सोडवण्यात अपयशी

मळई या गावांमध्ये आदिवासी समाज बांधव मोठ्या प्रमाणात राहत असतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावाला अद्यापही रस्ताच मिळालेला नाही. त्यामुळं या गावातील नागरिकांना रस्त्यांसाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. याच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे याच आदिवासी समाजाचे आहेत. परंतू, पालकमंत्री सुद्धा त्यांच्या समाजातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरताना पाहायला मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. आमच्या गावाला रस्ता द्यावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Satara Weather Update: कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला