एक्स्प्लोर

Hingoli : संतापजनक! हिंगोलीत लाखो रुपये खर्चून आणलेल्या तीन नव्या कोऱ्या शववाहिका धूळ खात; वर्षभरापासून हस्तांतरण प्रलंबित

Hingoli Government Ambulance Issue : या तीनही शववाहिका जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात आडगळीच्या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आल्याचं दिसतंय. 

हिंगोली : मृतदेहाची वाहतूक सन्मानपूर्वक आणि सुलभ पद्धतीने व्हावी यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करुन तीन शववाहिका उपलब्ध करून दिल्या. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने हिंगोली जिल्ह्याला मिळालेल्या तीन नव्या कोऱ्या आणि वातानुकूलित (AC) शववाहिका (Hingoli Government Hospital Ambulance) गेल्या वर्षभरापासून वापराविना पडून आहेत.

गरिबांना मृतदेहांच्या वाहतुकीसाठी खासगी वाहनांचा अवाजवी खर्च सोसावा लागत असताना, दुसरीकडे शासनाने दिलेल्या अत्याधुनिक वातानुकूलित शववाहिका केवळ हस्तांतरण न झाल्यामुळे हिंगोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात धुळीने माखलेल्या अवस्थेत उभ्या आहेत.

Hingoli Ambulance Issue : वर्ष झाले तरी हस्तांतरण नाहीच!

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल्या या तीन शववाहिका हिंगोली जिल्ह्याला उपलब्ध होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, अद्यापही या शववाहिकांचं कोणत्याही आरोग्य संस्था किंवा इतर संबंधित आस्थापनांकडे अधिकृत हस्तांतरण करण्यात आलेलं नाही.

या तीनही शववाहिका जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात आडगळीच्या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आल्या आहेत. दीर्घकाळ एकाच ठिकाणी उभ्या असल्याने त्यांच्यावर आता धुळीचे मोठे थर साचले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, एका वर्षांपूर्वी दाखल झालेल्या या शववाहिकांविषयी जेव्हा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी या गाड्या केवळ 4 ते 5 महिन्यांपूर्वीच आल्याची माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या या उत्तरावरून आरोग्य विभागाचा सावळा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Hingoli Civil Hospital News : पालिकेची मागणी धुडकावली; जनतेची लूट

गरिबांचे हाल थांबवण्यासाठी आणि नागरिकांना मोफत सेवा देण्यासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वीच वसमत नगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागाकडे एका शववाहिनीची रीतसर मागणी करण्यात आली होती. परंतु, आरोग्य विभागाने अद्यापही वसमत पालिकेला ती शववाहिनी हस्तांतरित केलेली नाही.

परिणामी, जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या नातेवाईकांचा मृतदेह वाहून नेण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स किंवा वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खाजगी चालकांकडून यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जात असून, जनतेची आर्थिक लूट होत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी अशा प्रकारे धुळीत मिळत असल्यामुळे हिंगोलीतील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ही बातमी वाचा:

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hingoli Crime News: दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 'तो' फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नमंडपात जाताच नवऱ्याचं संतापजनक कृत्य
दुसऱ्या लग्नासाठी नटलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा 'तो' फोटो फेसबुकवर आला अन् पहिल्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली; लग्नमंडपात जाताच नवऱ्याचं संतापजनक कृत्य
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईसह कोकणाला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट; राज्यातही पावसाचा जोर वाढणार, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
फुटलेले खासदार भाजपात न जाता मिंधेकडेच का गेले? हे ऑपरेशन टायगर नाही तर 'ऑपरेशन देवेंद्र', हिंगोलीतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फुटलेले खासदार भाजपात न जाता मिंधेकडेच का गेले? हे ऑपरेशन टायगर नाही तर 'ऑपरेशन देवेंद्र', हिंगोलीतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
Embed widget