High Court On Stray Dogs : दिल्लीच्या एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे श्वानप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे मोकाट कुत्रे नियंत्रणासाठी विविध कायदेशीर मार्ग असतांना परिस्थिती जैसे थेच का? असा सवाल नागपूर खंडपीठाकडून नागपूर महानगरपालिकेला (Nagpur Municipal Corporation) विचारण्यात आला आहे. यासाठी खंडपीठाने महानगरपालिकेच्या जबाबदार ठरवत संबंधित अधिकाऱ्यांची नावे मागितली आहे. त्यांनी आपली जबाबदारी पार न पाडल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे ही नागपूर खंडपीठाने सांगितले आहे.

आतापर्यंत पोलिसांकडून एकही कारवाई नाही?

नागपूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा हैदोस थांबविण्यासाठी व्यावसायिक विजय तालेवार आणि मनोज शाक्य यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने हे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणासाठी नसबंदी करता येते. रॅबीजचा अँटी रॅबिज इंजेक्शन देता येते. मात्र उपायाची अमलबाजवणी होत नाही. पोलीस कायद्यात ही अनेक तरतूद आहे. रोडवर खायला घालणाऱ्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकतो. मात्र, आतापर्यंत पोलिसांनी एकही कारवाई केलेली नाही.

परिणामी, मोकाट कुत्र्यांचा धोका कायम आहे. ते रोजच कोणाचे ना कोणाचे लचके तोडत आहेत. यापुढे मोकाट कुत्रे नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस विभागातील कोणते अधिकारी जबाबदार राहतील, याची माहिती सादर करा, असे निर्देश ही खंडपीठाने दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे विशेष खंडपीठ आज भटक्या कुत्र्यांवरील खटल्याची सुनावणी करणार

दुसरीकडे, दिल्लीच्या एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे श्वानप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. अशातच, आता सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या नव्याने स्थापन केलेल्या विशेष खंडपीठाकडे पाठवले आहे. नवीन खंडपीठ आज गुरुवारी (14 ऑगस्ट) या प्रकरणाची सुनावणी करेल. मिळालेल्या माहितीनुसार, जुने न्यायाधीश या सुनावणीचा भाग असणार नाहीत. त्यांनी भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात पाठवण्याचा आदेश दिला होता.

भटक्या कुत्र्यांशी संबंधित या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या विशेष खंडपीठासमोर होणार आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ज्या न्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी केली होती ते त्यात सहभागी होणार नाहीत. भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात ठेवण्याचा निर्णय दिला होता, परंतु श्वानप्रेमींनी या विरोधात शांततापूर्ण मेणबत्ती मार्च काढला होता.

ही बातमी वाचा: