Harshwardhan Sapkal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)  पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केलाय. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal)  यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली’ असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली. पण सरकारचा जीआर काय सांगतो? तर हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार आहे. इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान 20 विद्यार्थ्यांची अट ठेवण्यात आली आहे. म्हणजेच पर्यायाचा देखावा आणि हिंदी लादण्याचा ठरवलेला कट आहे. असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. 

मराठी माणसांशी निष्ठा नसून ती दिल्लीश्वरांशी आहे-  हर्षवर्धन सपकाळ

दरम्यान, हा भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच असून हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना संपवण्याचे कारस्थान आहे. फडणवीस, शिंदे, अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी, मराठी माणसांशी नाही, दिल्लीश्वरांशी आहे, हेच यातून स्पष्ट होते. वारंवार बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेणा-या शिंदे गटाकडेच शिक्षणखातं असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, तशाच प्रकारे मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली आहे. तर अजित पवार सत्तेसाठी इतके लाचार आहेत की त्यांना तर महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस जगले काय मेले काय? याच्याशी काही देणे घेणे नाही. फक्त आपल्याला अर्थखातं मिळावे, हेच अजित पवारांचे धोरण आहे. संघ आणि भाजपचा हा 'एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती' चा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठला असून तो  झुगारून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही! असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

हिंदवी स्वराज्य विरुद्ध हिंदीराष्ट्र असा हा वाद आहे-  हर्षवर्धन सपकाळ

मराठी संपवण्याचा घाट देवेंद्र फडणवीस यांनी घातला होता, ⁠याचा विरोध आता सर्वांनी करावा. ⁠शाळा सुरु होत आहे. ⁠त्याचे गणवेश, पुस्तके , फी वाढ या संदर्भात अद्याप निर्णय नाही. ⁠मात्र हिंदी सक्तीच्या मागे लागले आहेत. ⁠भाजप संविधानाला मानत नाही. ⁠विविधतेत एकता ते मानत नाही. ⁠हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र अस ते सांगड घालतात. ⁠हिंदवी स्वराज्य विरुद्ध हिंदीराष्ट्र असा हा वाद आहे. ⁠मराठी बाणा, संस्कृती आहे हे मिटवण्याच काम देवेंद्र फडणवीस करत आहे. ⁠फडणवीस यांनी त्यांच्या कूटूबांला कोणतीही हिब्रू आणि इतर भाषा शिकवावी, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.  

आणखी वाचा 

Sanjay Raut : भाजप हा देशद्रोही आणि बकवास पक्ष, सलीम कुत्ता सोडा, दाऊदलाही पक्षात आणतील; बडगुजरांच्या प्रवेशानंतर राऊतांचा हल्ला