Donald Trump H1B Visa:  अमेरिकेत रोजगारसंधी मिळवण्यासाठी उच्चकौशल्यप्राप्त भारतीयांना उपयुक्त ठरलेल्या एच-1बी व्हिसासंदर्भात (H-1B Visa) एकमहत्वपूर्णबातमीसमोरआलीआहे. एच-1बी व्हिसासाठी अर्ज करताना एक लाख अमेरिकी डॉलर इतके शुल्क (H-1B Visa Fees) ट्रम्प प्रशासनाने लावले होते. मात्र, हे शुल्क सध्या एच-1बी व्हिसा मिळालेल्या, या व्हिसावर अमेरिकेत सध्या वास्तव्यास असणाऱ्या आणि वास्तव्याचा काळ वाढवू इच्छिणाऱ्या तसेच स्वतः दर्जा किंवा श्रेणी (स्टेटस) बदलू इच्छिणाऱ्या भारतीयांना आता लागू होणार नाहीये, असे ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाने याबाबतमहत्वपूर्णनिर्णयघेतहे स्पष्ट केले आहे. तसेच नवी मार्गदर्शक तत्त्वे देखील प्रसिद्ध केली आहेत.

विद्यमान व्हिसा धारकांसाठी दिलासा (Relief for existing visa holders)

यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (US Citizenship and Immigration Services) ने त्यांच्या नवीनतम मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, एक लाख अमेरिकी डॉलर्सची फी अमेरिकेत आधीच वैध व्हिसावर असलेल्या कोणालाही लागू होणार नाही, ज्यामध्ये एफ-1 विद्यार्थी व्हिसा धारक, एल-1 इंट्रा-कंपनी ट्रान्सफर करणारे आणि नूतनीकरण किंवा मुदतवाढ मागणारे सध्याचे एच-1बी व्हिसा धारक यांचा समावेश आहे. ही घोषणा "पूर्वी जारी केलेल्या आणि सध्या वैध एच-1बी व्हिसा किंवा 21 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापूर्वी सादर केलेल्या कोणत्याही याचिकांना लागू होत नाही," असे एजन्सीने स्पष्ट केले. त्यात असेही म्हटले आहे की एच-1बी धारकांना निर्बंधाशिवाय अमेरिकेत आणि बाहेर प्रवास करणे सुरू ठेवता येईल, जे शुल्क घोषणेनंतर उपस्थित झालेल्या सर्वात मोठ्या चिंतेपैकी एक आहे.

यूएससीआयएसने पुढे पुष्टी केली की, स्थिती बदलण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यमान परदेशी नागरिकांना - जसे की एफ-१ व्हिसावर एच-१बी नोकऱ्यांमध्ये बदलणारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी - नवीन शुल्क भरावे लागणार नाही.

एच 1 बी व्हिसा काय आहे? (What is an H1B visa?)

सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसारख्या 'खास' कामांमध्ये कुशल असणाऱ्या परदेशी व्यक्तींसाठी एच 1 बी व्हिसा जारी केला जातो. सामान्यतः उच्चशिक्षितांना हा व्हिसा दिला जातो. नोकरदाराच्या वतीने कंपनीला इमिग्रेशन विभागाकडे अर्ज करावा लागतो. 1990 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ही व्यवस्था सुरु केली होती. उच्चस्तरीय कुशल व्यावसायिकांना नियुक्त करण्यासाठी अमेरिकन कंपन्या एच 1 बी व्हिसाचा वापर करतात. आऊटसोर्सिंग फर्म्सना मुख्यत्वे हे व्हिसा जारी केले जातात. त्यामुळे कनिष्ठ स्तरावरील नोकरभरतीसाठी या व्हिसाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला जातो. गेल्या वर्षी अमेरिकेला एच 1 बी व्हिसासाठी दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते.

ही बातमी वाचा: