Guru Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रहाला ज्ञान, वैवाहिक जीवन, शिक्षण, धार्मिक कार्य, पैसा, आणि वृद्धीचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे ज्योतिषीय दृष्टीकोनातून विवाह मुहूर्तात गुरुची स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि गुरुचा अस्त अशुभ मानला जातो. 

वैदिक पंचांगानुसार, आज म्हणजेच 11 जून रोजी गुरु देव बृहस्पती पश्चिम दिशेने अस्त होणार आहे. त्यानंतर 7 जुलै रोजी पूर्व दिशेने उदय होणार आहे. त्याचबरोबर 6 जुलै रोजी चातुर्मासाची सुरुवात देखील होणार आहे. 

गुरुचा होणार उदय 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, लग्नाच्या वेळी गुरु ग्रह बृहस्पतीचं उदय होणं फार महत्त्वाचं मानलं जातं. गुरुच्या अस्त होण्याने कर्क, मीन आणि धनु राशीच्या लोकांना या काळात संकटांचा सामना करावा लागू शकतो. या काळात गुंतवणूक करु नका. 

'हे' करा उपाय 

  • नेहमी कपाळावर केसरचा टिळा लावावा. 
  • गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करा. तसेच, पिवळ्या रंगाची फुलं, चंदन, मिठाई आणि केळी देवाला अर्पण करा. 
  • गुरुवारच्या दिवशी तुमच्या घराच्या आग्नेय कोनाच्या दिशेने दक्षिण-पूर्व दिशाच्या कोनाला तुपाचा दिवा लावा. 
  • गुरुवारच्या दिवशी पाण्यात एक चिमूटभर हळद टाकून स्नान करा. 
  • गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात केशर आणि चण्याची डाळ दान करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                                                                                                                                                        

Shani Kendra Yog : कर्मफळदाता शनी आणि गुरुचा होतोय संगम; 15 जूनपासून 'या' राशींना लागणार लॉटरी, हातात खेळणार पैसाच पैसा